मराठा युवकांनो, उद्योगाकडे वळा : संभाजीराजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2018 11:52 PM2018-10-07T23:52:37+5:302018-10-07T23:55:12+5:30

Maratha youth, turn to the industry: SambhajiRaje | मराठा युवकांनो, उद्योगाकडे वळा : संभाजीराजे

मराठा युवकांनो, उद्योगाकडे वळा : संभाजीराजे

Next

कोल्हापूर : मराठा युवकांनी उद्योग क्षेत्राकडे वळावे. त्यांना लागेल ती सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही खासदार संभाजीराजे यांनी रविवारी येथे दिली.
कोल्हापुरात मराठा उद्योजक लॉबीतर्फे आयोजित राज्यव्यापी मराठा उद्योजक मेळाव्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी उद्योजक लॉबीचे नेते उद्योजक विनोद बडे होते. यावेळी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, उद्योजक चंद्रकांत जाधव, उद्योजक लॉबीचे प्रदेशाध्यक्ष सुदर्शन झिंजुर्डे (नाशिक), सरचिटणीस अमोल महाडिक (नाशिक), प्रसिद्धीप्रमुख स्वप्निल काळे (नाशिक), संयोजक संदीप पाटील (सांगली), अनिल सुरवसे (पुणे), विनय निकम, उद्योजिका सुप्रिया जगदाळे (पुणे), सुनीता जाधव (सांगली) यांची उपस्थिती होती.
संभाजीराजे म्हणाले, राजर्षी शाहू छत्रपतींनी आपल्या कार्यकाळात उद्योगांना चालना देत अनेक युवकांना उद्योजक म्हणून उभे केले. मराठा युवकांनीही उद्योग क्षेत्राकडे वळावे. त्यांना लागेल ती मदत आपण करू; परंतु कष्टाची तयारी ठेवावी लागेल. वसंतराव मुळीक म्हणाले, मराठा समाज आर्थिक अरिष्टात आहे. त्यामुळे उद्योजक बनणे हे आव्हान आहे; परंतु त्यांनी आत्मविश्वासाने सामोरे जाऊन शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेतल्यास त्यांना यश नक्की मिळेल.
मोटारसायकल रॅलीद्वारे ‘लाख मराठा’चा जयघोष
मेळाव्यापूर्वी रुईकर कॉलनी येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मेळाव्याच्या ठिकाणापर्यंत मराठा युवकांच्या वतीने मोटारसायकल रॅली काढण्यात आली. यावेळी ‘एक मराठा, लाख मराठा’, ‘मराठा आर्थिकदृष्ट्या सक्षम झालाच पाहिजे,’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
८०० प्रतिनिधी उपस्थित
या मेळाव्यासाठी राज्यासह गुजरात व कर्नाटकमधून सुमारे ८०० मराठा युवक प्रतिनिधी उपस्थित होते. पंढरपूर, बुलढाणा, अमरावती, नाशिक, अहमदनगर, विरार येथील युवकांचा यामध्ये समावेश होता.

Web Title: Maratha youth, turn to the industry: SambhajiRaje

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.