मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहीजे, मावळा कोल्हापूरतर्फे निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2020 03:58 PM2020-09-13T15:58:58+5:302020-09-13T16:01:54+5:30

मराठ्याना आरक्षण मिळाले पाहीजे. केंद्राने घटना दुरुस्ती करून ओबीसी कोटा वाढवावा. या मागणीसाठी रविवारी सकाळी मावळा कोल्हापूरतर्फे मिरजकर तिकटी येथे जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी राज्य व केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.

Marathas must get reservation | मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहीजे, मावळा कोल्हापूरतर्फे निदर्शने

मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहीजे, मावळा कोल्हापूरतर्फे निदर्शने

Next
ठळक मुद्देमराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहीजेमावळा कोल्हापूरतर्फे मिरजकर तिकटी येथे निदर्शने

 कोल्हापूर : मराठ्याना आरक्षण मिळाले पाहीजे. केंद्राने घटना दुरुस्ती करून ओबीसी कोटा वाढवावा. या मागणीसाठी रविवारी सकाळी मावळा कोल्हापूरतर्फे मिरजकर तिकटी येथे जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी राज्य व केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.

आंदोलनाची सुरुवात जिजाऊ वंदनाने करण्यात आली. जोपर्यंत घटनादुरुस्ती करून मराठा समाजाचा सरसकट ओबीसीमध्ये समावेश होत नाही. तोपर्यंत मराठा आरक्षण कोर्टात टिकू शकत नाही. त्यामुळे केंद्राने घटनादुरुस्ती करून ओबीसी कोटा वाढवावा . यासाठी राज्यसरकारने केंद्रावर दबाव आणावा.

यंदाच्या शैक्षणिक २०२०-२१ च्या प्रवेश प्रक्रीयेत कोणत्याही मराठा विद्यार्र्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे शैक्षणिक नुकसान होवू नये. येत्या काळात मराठा आरक्षण नसलेली नोकरभरती राज्य सरकारने करु नये. राज्य सरकारने वटहुकूम काढावा.

राज्याचा विधी विभाग व अटर्नी जनरल अशितोष कुंभकोणी मराठा आरक्षण संबधी बाजू मांडण्यात हयगय केली. त्यांच्यावर हक्कभंग प्रस्ताव आणून त्यांना पदावरून दुर करावे. समाजाच्या प्रलंबित मागण्या तात्काळ मान्य कराव्यात. अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

यावेळी उमेश पोवार, रोहीत राऊत, अमोल गायकवाड, उदयसिंह देसाई, राकेश भोसले, राजू चव्हाण, संताजी भोसले, मिलिंद पाटील, गौरव पाटील, रणधीर जांभळे, धनंजय माळी, ज्ञानेश्वर गावडे, जयकुमार शिंदे, तुषार शिंदे, करण खोत, निलेश चव्हाण, रामदास पाटील किरण पवार, रमाकांत बिरंजे,आदी उपस्थित होते.
 

Web Title: Marathas must get reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.