माझ्या आईसाठी मी मराठीतच बोलीन...; हजारो शाळकरी विद्यार्थ्यांनी घेतली शपथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 04:43 PM2020-02-27T16:43:13+5:302020-02-27T17:10:44+5:30

‘मी मराठीतच बोलीन...’ अशी प्रतिज्ञा येथील न्यू एज्युकेशन सोसायटीच्या अंतर्गत येणाऱ्या विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी घेतली. ‘मराठी राजभाषा दिना’निमित्त ‘लोकमत’च्या वतीने गुरुवारी पेटाळा मैदानावर हा उपक्रम राबविण्यात आला. एस. एम. लोहिया, न्यू हायस्कूल, न्यू हायस्कूल मराठी शाखा येथील सुमारे ३५०० विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी या उपक्रमात अत्यंत उत्साहाने सहभागी झाले.

Marathi Official Day Special: I will speak in Marathi for my mother ... !! | माझ्या आईसाठी मी मराठीतच बोलीन...; हजारो शाळकरी विद्यार्थ्यांनी घेतली शपथ

कोल्हापुरात गुरुवारी मराठी राजभाषा दिनानिमित्त ‘लोकमत’तर्फे आयोजित ‘मराठीत बोला ना..’ या उपक्रमांतर्गत न्यू एज्युकेशन सोसायटीच्या अंतर्गत सर्व शाळांतील सुमारे साडेतीन हजार विद्यार्थ्यांनी ‘मी मराठीत बोलीन...’ ही प्रतिज्ञा केली. (छाया : आदित्य वेल्हाळ )

googlenewsNext
ठळक मुद्देमराठी राजभाषा दिन विशेष : माझ्या आईसाठी मी मराठीतच बोलीन...!! लोकमत’चा उपक्रम :कोल्हापुरात ३५०० विद्यार्थ्यांनी घेतली प्रतिज्ञा

कोल्हापूर : ‘मी मराठीतच बोलीन...’ अशी प्रतिज्ञा येथील न्यू एज्युकेशन सोसायटीच्या अंतर्गत येणाऱ्या विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी घेतली. ‘मराठी राजभाषा दिना’निमित्त ‘लोकमत’च्या वतीने गुरुवारी पेटाळा मैदानावर हा उपक्रम राबविण्यात आला. एस. एम. लोहिया, न्यू हायस्कूल, न्यू हायस्कूल मराठी शाखा येथील सुमारे ३५०० विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी या उपक्रमात अत्यंत उत्साहाने सहभागी झाले.

मराठी भाषेचा वापर सर्वांनी करावा, आपली मातृभाषा अधिक समृध्द व्हावी यासाठी ‘लोकमत’ने मराठी बोला ना.. ही मोहिम हाती घेतली आहे. त्याचा भाग म्हणून मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधत गुरुवारी शालेय विद्यार्थ्यांना नेहमी मराठी भाषेतच संवाद साधवा यासाठी ‘मी मराठीत बोलीन...’ अशी प्रतिज्ञा देण्यात आली.

एस. एम. लोहिया हायस्कूल ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य एस.एस. चव्हाण म्हणाले,‘ खऱ्या अर्थाने मराठी ही महाराष्ट्राची मातृभाषा असून ती सर्वांनी जपली पाहिजे. मधल्या काळात समाजमाध्यमांमुळे मराठी भाषा लोप पावते काय, अशी भीती व्यक्त केली जात होती; परंतु असे झाले नाही. या उलट समाजमाध्यमांवरच मराठीचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाला. शासनानेही आता मराठी भाषा सक्तीची केली असून, ही आनंदाची बाब आहे.’

एस. एम. लोहिया हायस्कूल ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य एस. एस. चव्हाण यांनी सर्वांना प्रतिज्ञा दिली. आर. आय. पोवार, आर. जी. देशपांडे, बी. एस. चोपदार, एस. पी. कुलकर्णी, एस. ए. शिंदे, न्यू हायस्कूलचे मुख्याध्यापक के. ई. पोवार, सयाजी पाटील, एच. बी. खानविलकर, प्रदीप पोवार, व्ही. बी. पाटील, वाय. एस. पोवार, न्यू हायस्कूल मराठी शाळेचे मुख्याध्यापक सुलभा कांबळे, शिक्षक स्नेहल रेळेकर, कैलास भोईटे, दशरथ कुंभार, चारूशीला पाटील, ऊर्मिला ओमासे यांनी विद्यार्थ्यांसह मराठीत बोलण्याची प्रतिज्ञा घेतली.



मराठी भाषा मला आईसारखी असून व्यवहारात याच भाषेत बोलले पाहिजे. मातृभाषा असल्यामुळे महाराष्ट्रातील सर्वांनी तिचा वापर केला पाहिजे. या संदर्भात जनजागृती करण्याचा ‘लोकमत’चा हा उपक्रम कौतुकास पात्र आहे.
वरद कोकारे, नववी


मराठीसोबत हिंदी, इंग्रजी अशा सर्व भाषांचे शिक्षण घेतले पाहिजे. मात्र, आपण ज्या राज्यात राहतो, त्या राज्याच्या मातृभाषेतच बोलणे योग्य आहे. रोजचा संवाद हा मराठीतच झाला पाहिजे.
- सुमेध कुलकर्णी, नववी

प्रतिज्ञा

मी मराठीत बोलीन
एकमेकांशी बोलताना
भाजी विकत घेताना
मी मराठीत बोलीन
सवय म्हणून
आवड म्हणून
भाषेवर प्रेम म्हणून
माझी निवड म्हणून
मी मराठीत बोलीन
माझ्या भाषेच्या भविष्यासाठी
माझ्या परंपरांना जपण्यासाठी
मराठीसाठी
माझ्या आईसाठी
पण सर्वांत जास्त
माझ्यासाठी
मी मराठीत बोलीन
 

 

Web Title: Marathi Official Day Special: I will speak in Marathi for my mother ... !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.