कोषागार, नियोजन आणि बँकांमध्ये ३१ मार्चची धादंल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 06:01 PM2021-03-31T18:01:25+5:302021-03-31T18:03:40+5:30

Economy Kolhapur BankingSector-आर्थिक वर्षाच्या अखेरीला आर्थिक गणित जुळवताना जिल्ह्याचे कुबेर असलेल्या कोषागार कार्यालय, जिल्हा नियोजन समिती व बँकांमध्ये बुधवारी एकच धांदल उडाली होती. तीन दिवसांच्या सुट्टीतही सलग काम केल्यानंतर अखेरच्या दिवशी या कार्यालयांमधील कर्मचारी रात्री उशीरापर्यंत काम पूर्ण करण्यात गुंतले होेते.

March 31 in treasury, planning and banks | कोषागार, नियोजन आणि बँकांमध्ये ३१ मार्चची धादंल

कोल्हापुरातील कोषागार कार्यालयात बुधवारी ३१ मार्च या आर्थिक वर्षाच्या अखेरच्या दिवशी वर्षभराचा ताळेबंद व कामकाजाच्या फायली पूर्ण करण्यासाठी कर्मचारी कार्यालयात तळ ठोकून होते. (छाया : नसीर अत्तार)

googlenewsNext
ठळक मुद्देकोषागार, नियोजन आणि बँकांमध्ये ३१ मार्चची धादंल अधिकारी-कर्मचारी कार्यालयात तळ ठोकून

कोल्हापूर : आर्थिक वर्षाच्या अखेरीला आर्थिक गणित जुळवताना जिल्ह्याचे कुबेर असलेल्या कोषागार कार्यालय, जिल्हा नियोजन समिती व बँकांमध्ये बुधवारी एकच धांदल उडाली होती. तीन दिवसांच्या सुट्टीतही सलग काम केल्यानंतर अखेरच्या दिवशी या कार्यालयांमधील कर्मचारी रात्री उशीरापर्यंत काम पूर्ण करण्यात गुंतले होेते.

नवीन वर्ष जानेवारीत सुरू होत असले तरी आर्थिक वर्ष मात्र १ एप्रिल ते ३१ मार्च पर्यंत असते. वर्षभरातील सर्व व्यवहार, ताळेबंद, नफा तोटा, आगामी वर्षातील कामांचे नियोजन यासगळ्या बाबी ३१ मार्च अखेर पूर्ण करुन ते शासनाला पाठवावे लागते. त्यामुळे मार्च महिना आला की पतपुरवठा करणाऱ्या संस्था, राष्ट्रीयीकृत, सहकारी नागरी बँका, जिल्ह्याचे अर्थकारण सांभाळणारी नियोजन समिती व कोषागार या महत्वाच्या शासकीय कार्यालयांमध्ये मोठी धांदल उडते, त्यात बुधवारी ३१ मार्च असल्याने वेळेत काम पूर्ण करण्यासाठी विभागांमध्ये एकच धांदल उडाली आहे.
 

Web Title: March 31 in treasury, planning and banks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.