...तर आरक्षणासाठी मुंबईची कोंडी करणार ४ सप्टेंबरला ‘गाडी मार्च’ : सकल मराठा समाजाच्या बैठकीत निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 12:56 AM2018-08-23T00:56:30+5:302018-08-23T00:56:56+5:30

या महिनाअखेर मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशनाची घोषणा न केल्यास ५ सप्टेंबर रोजी मुंबईला धडक मारण्याचा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.

 ... 'March Mar' on 4th September: A decision in the meeting of the Gross Maratha community | ...तर आरक्षणासाठी मुंबईची कोंडी करणार ४ सप्टेंबरला ‘गाडी मार्च’ : सकल मराठा समाजाच्या बैठकीत निर्णय

...तर आरक्षणासाठी मुंबईची कोंडी करणार ४ सप्टेंबरला ‘गाडी मार्च’ : सकल मराठा समाजाच्या बैठकीत निर्णय

Next

कोल्हापूर : या महिनाअखेर मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशनाची घोषणा न केल्यास ५ सप्टेंबर रोजी मुंबईला धडक मारण्याचा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे. हजारो चारचाकी वाहने आणि कार्यकर्त्यांनी मुंबईत जाऊन तेथे शहराचीच कोंडी केल्याशिवाय सरकार जागे होणार नाही; म्हणूनच हा ‘गाडी मार्च’ काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील विविध संघटना, कार्यकर्त्यांच्या येथे झालेल्या दिवसभराच्या बैठकीनंतर बुधवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, मुख्यमंत्री आणि महसूलमंत्री विशेष अधिवेशन घेणार, असे सर्वत्र सांगत आहेत. त्यांनी ३१ आॅगस्टच्या आत ही तारीख जाहीर करावी. आमच्या मागण्यांबद्दल अधिवेशनामध्ये चर्चा व्हावी, मराठा समाजासाठीच्या योजनांसाठी आर्थिक तरतूद काय केली हे सांगावे. अन्यथा ४ सप्टेंबरला कोल्हापुरातील दसरा चौकातून मुंबईकडे ‘गाडी मार्च’ निघेल.

या मार्चदरम्यान कार्यकर्ते विविध जिल्ह्यांतील हजारो गाड्या घेऊन सहभागी होणार आहेत. मात्र, मुंबईत आम्हांला अडविल्यास बेमुदत आंदोलन सुरू करणार आहोत. जर आरक्षण देणे जमणार नसेल तर आम्ही नालायक आहोत, असे सांगून सरकारने पायउतार व्हावे.शासनाच्या भूमिकेबाबत सावंत म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे दोन महिन्यांपूर्वी हे प्रकरण न्यायालयात आहे, असे सांगत होते. परळी, कोल्हापूर येथे आंदोलने सुर झाल्यानंतर राज्य मागासवर्गीय अहवालाचे कारण पुढे करण्यात आले. मात्र आरक्षण कसे देणार आहे, हे अजूनही या दोघांनीही सांगितलेले नाही.

वसंतराव मुळीक म्हणाले, जरी आम्ही मुंबईला आंदोलनासाठी गेलो तरी दसरा चौकातील आंदोलन आमच्या मराठमोळ्या महिला नेटाने पुढे चालविणार आहेत. १000 गाड्या आत्ताच तयार असल्याचे हर्षल सुर्वे यांनी सांगितले. या आंदोलनादरम्यान मंत्रालयाला घेराव घालावा, स्टॉक एक्स्चेंजचे काम बंद पाडावे, अशा सूचना कार्यकर्त्यांनी बैठकीत केल्या. यावेळी चंद्रकांत पाटील, प्रज्ञा जाधव, मुंबई; प्रवीण पाटील, सांगली, प्रा. नानासाहेब धाटे, कर्जत, अहमदनगर; निखिल जाधव, सातारा, प्रवीण जाधव, वाई यांच्यासह कोल्हापूरचे कार्यकर्ते उपस्थित होते.

इतर मागास कोट्यातूनच आरक्षण हवे
सावंत म्हणाले, आम्हीही आता अभ्यास केला आहे. गुज्जर, जाट यांचे आरक्षण न्यायालयात टिकले नाही; त्यामुळे मराठा समाजाला इतर मागास कोट्यामधूनच आरक्षण दिले तरच ते टिकू शकते. तेव्हा याच पद्धतीने आम्हाला आरक्षण पाहिजे. आता तहात हरण्याची आमची मन:स्थिती नाही.

‘गेटवे आॅफ इंडिया’वर ठिय्या आंदोलन
दिलीप देसाई म्हणाले, गेटवे आॅफ इंडियावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर शिवरायांना वंदन करून आम्ही तेथे बसणार आहोत. शासन ऐकत नसल्याने मराठा आरक्षणाबाबत ग्रामपंचायतींनी केलेले सर्व ठराव आम्ही समुद्राला अर्पण करणार आहोत.

श्रीमंत शाहू महाराजांची गाडी पहिली
मुंबईकडे जाणाऱ्या मार्चमध्ये माझी गाडी सर्वांत पुढे असेल, असा शब्द श्रीमंत शाहू महाराजांनी आम्हाला दिल्याचे यावेळी इंद्रजित सावंत यांनी सांगितले. याच पद्धतीने आता भाषणे करणाºया सर्वच नेत्यांनी आपल्या गाड्या मार्चच्या पुढे लावाव्यात, असे आवाहन करण्यात आले.

Web Title:  ... 'March Mar' on 4th September: A decision in the meeting of the Gross Maratha community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.