मार्दवतेनेच अंतरंग उजळेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:05 AM2021-02-20T05:05:47+5:302021-02-20T05:05:47+5:30
यड्राव : समाजामध्ये वावरताना अंतकरणापासून संपर्कात येणाऱ्या व्यक्तींच्या गुणांचा स्वीकार करावा. चांगले ते घ्यावे, मीपणा काढून चांगले असण्याचे न ...
यड्राव : समाजामध्ये वावरताना अंतकरणापासून संपर्कात येणाऱ्या व्यक्तींच्या गुणांचा स्वीकार करावा. चांगले ते घ्यावे, मीपणा काढून चांगले असण्याचे न दाखवता अंतकरणापासून चांगुलपणा निर्माण करावा. यासाठी विनयशीलता अंगीकारावी. यामुळेच अंतरंग उजळेल व एकमेकांशी चांगले संबंध रुजले जातील, असे प्रतिपादन बालब्रह्मचारी संजय गोपलकर यांनी केले.
येथील कुंभोज मळा जिन मंदिरमध्ये वीर महिला मंडळ व वीर सेवा दल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्याख्यानमालेत मार्दव धर्म या विषयावर गोपळकर बोलत होते. अध्यक्षस्थानी शांतीनाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संतोष पाटील होते.
स्वागत कल्याणी यांनी केले. संतोष पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी महावीर पाटील, जिल्हा सूतगिरणीचे संचालक प्रकाश अकिवाटे, घन:शाम कुंभार, सुरेश मालगावे, शोभा पाटील, कुसुम पाटील, सुरेश कुंभोजे, प्रकाश कुंभार उपस्थित होते. सूत्रसंचालन ज्योती देसाई तर आप्पासाहेब पाटील यांनी आभार मानले.
फोटो - १८०२२०२१-जेएवाय-०५
फोटो ओळ - यड्राव (ता. शिरोळ) येथे वीर महिला मंडळाच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेत संजय गोपलकर यांनी मार्गदर्शन केले.