विवाहितेचा छळ; जयसिंगपूरच्या तिघांविरुध्द गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:51 AM2021-02-05T06:51:20+5:302021-02-05T06:51:20+5:30
जयसिंगपूर : माहेरहून घराच्या बांधकामासाठी ५ लाख रुपये व व्यवसायासाठी १० लाख रुपये आणावेत, यासाठी विवाहितेचा मानसिक व शारीरिक ...
जयसिंगपूर : माहेरहून घराच्या बांधकामासाठी ५ लाख रुपये व व्यवसायासाठी १० लाख रुपये आणावेत, यासाठी विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी पतीसह तिघांविरुध्द जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सन्मती शरद चौगुले (वय ३१, रा. काडगे मळा, जयसिंगपूर) यांनी तक्रार दिली आहे. पती शरद कांतीनाथ चौगुले, सासरे कांतीनाथ चौगुले, सासू कांचन चौगुले अशी संशयितांची नावे आहेत.
पोलिसांनी सांगितले की, २५ मे २०१०पासून ते २१ जानेवारी २०२१पर्यंत सासरच्या मंडळींकडून विवाहितेचा छळ सुरु होता. घर बांधकाम व व्यवसायासाठी माहेरहून पैसे आणावेत, यासाठी शिवीगाळ व मारहाण केली जात होती. तसेच विवाहितेकडून सोन्याचे दागिने काढून घेतानाच पैसे आणले नाहीस तर घटस्फोट देतो, अशीही धमकी देण्यात आली. अखेर सासरच्या जाचाला कंटाळून सन्मती यांनी पोलिसात तक्रार दिली.