बाजार समितीला ७५ लाखांचा वाढावा तर चार कोटींच्या ठेवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:23 AM2021-03-27T04:23:55+5:302021-03-27T04:23:55+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये अशासकीय मंडळाने काटकसरीचा कारभार केल्याने समितीच्या जिल्हा बँकेत चार ...

The market committee should be given an increase of Rs 75 lakh and deposits of Rs 4 crore | बाजार समितीला ७५ लाखांचा वाढावा तर चार कोटींच्या ठेवी

बाजार समितीला ७५ लाखांचा वाढावा तर चार कोटींच्या ठेवी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये अशासकीय मंडळाने काटकसरीचा कारभार केल्याने समितीच्या जिल्हा बँकेत चार कोटीच्या ठेवी ठेवू शकलो. त्याचबरोबर २०१९-२० या सालात ७५ लाखांचा वाढावा (नफा) झाला असून, कागल येथे जनावरांचा आठवडी बाजार ९ एप्रिल पासून सुरू करत असल्याची घाेषणा बाजार समितीचे अशासकीय मंडळाचे अध्यक्ष के. पी. पाटील यांनी केली.

बाजार समितीची १७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी समिती कार्यालयात ऑनलाइन झाली. कागल येथील जनावरांचा बाजार कधी सुरू करता? अशी विचारणा दत्ता पाटील (केनवडे) यांनी केली. यावर २१ एप्रिल रोजी हा बाजार सुरू करता? असून पेट्रोलपंप जागा मान्यतेसाठी महापालिकेकडे प्रस्ताव दिल्याचे सचिव जयवंत पाटील यांनी सांगितले. सचिव जयवंत पाटील यांनी अहवाल वाचन केले. प्रा. जालंदर पाटील यांनी आभार मानले. यावेळी बी. एच. पाटील, सूर्यकांत पाटील, अजित पाटील-परितेकर, कल्याणराव निकम, आर. वाय. पाटील, दिगंबर पाटील, अजित पाटील, दगडू भास्कर, उपसचिव के. बी. पाटील, राहुल सूर्यवंशी उपस्थित होते.

स्थलांतर न होणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करा

टेंबलाईवाडी धान्य बाजारासाठी लाखो रुपये खर्च केले, तरीही लक्ष्मीपुरी येथील व्यापारी तिथे जात नसतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई करा, अशी सूचना पांडुरंग पाटील (बाचणी) यांनी केली.

अशासकीय सदस्यांच्या अभिनंदनाचा ठराव

अशासकीय मंडळ आल्यापासून सभापती, उपसभापती गाड्यांचा वापर बंद, यासह अनेक चांगले निर्णय घेतले. त्यामुळे चार कोटीच्या ठेवी बँकेत ठेवता आल्या, याबद्दल अशासकीय मंडळाच्या अभिनंदनाचा ठराव भारत पाटील (भुये), पांडुरंग पाटील (बाचणी) यांनी मांडला.

देवकर चळवळीकडे लक्ष द्या

बाबासाहेब देवकर यांनी बाजार समित्यांना मारक केंद्र सरकारच्या कायद्याविरोधात समितीने आंदोलन उभे करावे, अशी सूचना केली. यावर, देवकर तुम्ही दुधातून (गोकुळ) बाजारात कसे आलात, दुधाकडे लक्ष कमी करून चळवळीकडे द्या, असा खोचक टोला के. पी. पाटील यांनी लगावला.

फोटो ओळी : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या शुक्रवारी समिती सभागृहात झालेल्या ऑनलाइन सभेत अशासकीय मंडळाचे अध्यक्ष के. पी. पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सूर्यकांत पाटील, जयवंत पाटील आदी उपस्थित होते. (फोटो-२६०३२०२१-कोल-बाजार समिती)

Web Title: The market committee should be given an increase of Rs 75 lakh and deposits of Rs 4 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.