बाजार समितीचे उत्पन्न ७८ लाखांनी घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 01:04 AM2019-07-15T01:04:27+5:302019-07-15T01:04:31+5:30

राजाराम लोंढे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या २०१८-१९ च्या उत्पन्नात तब्बल ७८ लाख ...

Market Committee's income declined by 78 lakhs | बाजार समितीचे उत्पन्न ७८ लाखांनी घटले

बाजार समितीचे उत्पन्न ७८ लाखांनी घटले

Next

राजाराम लोंढे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या २०१८-१९ च्या उत्पन्नात तब्बल ७८ लाख १३ हजार २१९ रुपयांनी घट झाली असून, खर्चात मात्र १ कोटी ५३ लाख ८१ हजार ६५० रुपयांची वाढ झाली आहे. समितीचा उत्पन्न मिळवून देण्यात आघाडीवर असणाऱ्या कांदा-बटाटा विभागातच यंदा मोठा फटका बसला असून, गतवर्षीपेक्षा एक कोटी पाच लाख उत्पन्न कमी झाले आहे. गेले वर्षीपासून समितीच्या वाढाव्यातील घट वाढत असून, २०१७-१८ मध्ये २२ लाखांनी, तर यावर्षी ५७ लाखांनी वाढावा कमी झाला आहे.
बाजार समितीत ‘गूळ-शेंग’, ‘कांदा-बटाटा-लसूण’, ‘भाजीपाला’, ‘फळे’, ‘धान्य-कडधान्य’ असे पाच प्रमुख विभाग कार्यरत आहेत. एकूणच उत्पन्नाच्या दृष्टीने हे पाच विभाग महत्त्वाचे आहेत. ‘गुळाची बाजारपेठ’ म्हणून कोल्हापूरची ओळख आहे. या विभागातून दरवर्षी सव्वादोन ते अडीच कोटींचे उत्पन्न मिळते; पण जिल्ह्यात कांदा व बटाट्याचे उत्पादन नसताना सर्वाधिक खरेदी-विक्री कोल्हापूर बाजार समितीत होते; त्यामुळे उत्पन्नातही गेले अनेक वर्षे हा विभाग पुढे होता. यंदा मात्र कांदा-बटाटा विभागाच्या उत्पन्नात तब्बल एक कोटी पाच लाख ५६ हजार ७२० रुपयांनी घट झाली आहे. त्याचा परिणाम समितीच्या एकूण उत्पन्नावर झाला आहे. कांदा व बटाट्याच्या एकूण किमतीवर एक टक्का सेस समिती घेते, यंदा दरात घसरण झाली. सरासरी ६ ते ७ रुपयांपर्यंत कांदा राहिल्याने उत्पन्न कमी झाले. त्यातच गुंतवणुकीवरील उत्पन्न ही १७ लाख ३१ हजाराने कमी झाले आहे; मात्र इतर उत्पन्नात ३६ लाख ६१ हजारांनी वाढ झाली आहे.
खर्चात सभा व संचालक खर्चात सात लाख ९५ हजार ७९३ ने वाढ झाली; मात्र आस्थापना खर्चात १९ लाख ८५ हजार, तर प्रशासकीय खर्च ७६ लाख ३३ हजारांनी कमी झाला आहे.
विभागनिहाय उत्पन्न असे
विभाग २०१७-१८ २०१८-१९ वाढ
गूळ २.४२ कोटी २.४५ कोटी २.९६ लाख
गूळ दंड व्याज १.५५ लाख १.७४ लाख १९ हजार
कांदा-बटाटा ३.२७ कोटी २.२२ कोटी १.०५ कोटी (घट)
फळे-भाजीपाला १.५८ कोटी १.६१ कोटी ३.२२ लाख
फळे-भाजीपाला सौदा ७.४८ लाख ११.१० लाख ३.६१ लाख
मालमत्ता २.३२ कोटी २.३९ कोटी ६.२१ लाख
प्रवेश फी व इतर माल २१.५८ लाख २२.३९ लाख ८१ हजार
पे अँड पार्क १६.०२ लाख ८.४२ लाख ७.६० लाख (घट)
वे-ब्रीज १७.०५ लाख १७.५६ लाख ५० हजार
जनावर बाजार ६.६३ लाख ५.५० लाख १.१३ लाख (घट)
सुरक्षा विभाग ८३.७० लाख ७७.२३ लाख ६.४७ लाख (घट)
आठवडा बाजार, आदी २.९२ लाख १.३४ लाख १.५७ लाख (घट)
चिवा, बांबू ३.४८ लाख ३.२० लाख २८ हजार (घट)
मलकापूर उपबाजार ३.२० लाख २.८० लाख ४० हजार (घट)
लक्ष्मीपुरी धान्य बाजार १.५२ कोटी १.५० कोटी २.०३ लाख (घट)

जनावरांचा बाजार
पूर्वी पश्चिम महाराष्टÑात कोल्हापूरचा जनावरांचा बाजार प्रसिद्ध होता; पण कोपार्डे (ता. करवीर) येथे जनावरांचा बाजार झाल्यानंतर समितीतील बाजार आतबट्ट्यात आला आहे. आता तर तिथे शेळ्या-मेंढ्यांचाच बाजार भरतो.

समितीच्या ठेवी ‘जैसे थे!’
समिती प्रशासन वाढाव्याची रक्कम ठेवरूपाने गुंतवणूक करते; पण गेले दोन वर्षे वाढाव्याची रक्कम सोयी-सुविधांवर खर्च होत असल्याने सात कोटी ७२ लाख २७ हजार ८८३ रुपयांच्या ठेवी कायम आहेत.

Web Title: Market Committee's income declined by 78 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.