शिरोळ येथे शिथिलतेनंतर बाजारात गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:23 AM2021-05-14T04:23:58+5:302021-05-14T04:23:58+5:30
शिरोळमध्ये कडक लॉकडाऊन करण्यात आले आहे. दरम्यान, शुक्रवारी होणाऱ्या सणांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना साहित्य खरेदी करण्यासाठी गुरुवारी त्यामध्ये शिथिलता आणण्यात ...
शिरोळमध्ये कडक लॉकडाऊन करण्यात आले आहे. दरम्यान, शुक्रवारी होणाऱ्या सणांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना साहित्य खरेदी करण्यासाठी गुरुवारी त्यामध्ये शिथिलता आणण्यात आली होती. सकाळी सहा ते बारा ही वेळ खरेदीसाठी देण्यात आली. मात्र, बुवाफन मंदिरशेजारी भरलेल्या भाजी विक्रीच्या ठिकाणी भाजी खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली. आज शुक्रवारी होणाऱ्या रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. दरम्यान, पालिकेकडून भाजी विक्रेत्यांना तसेच व्यावसायिकांना कोविड नियम पाळण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या होत्या. आज शुक्रवारपासून पुन्हा कडक लॉकडाऊन सुरू राहणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
फोटो - १३०५२०२१-जेएवाय-०३
फोटो ओळ - शिरोळ येथील बुवाफन मंदिरशेजारी भरविण्यात आलेल्या बाजारात नागरिकांची गर्दी दिसून आली. (छाया-सुभाष गुरव, शिरोळ)