बाजार भरला, पण कोरोना येऊ नकोस...वडगावातील स्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:18 AM2021-06-29T04:18:05+5:302021-06-29T04:18:05+5:30
वडगाव ही परिसरांची हक्कांची बाजारपेठे आहे. त्यामुळे सोमवारी बाजारपेठेत गर्दी असते. आजही तसेच झाले. भाजीपाला व कापड व्यापाऱ्यांनी कोरोनाविषयक ...
वडगाव ही परिसरांची हक्कांची बाजारपेठे आहे. त्यामुळे सोमवारी बाजारपेठेत गर्दी असते. आजही तसेच झाले. भाजीपाला व कापड व्यापाऱ्यांनी कोरोनाविषयक नियमांकडे दुर्लक्ष करून व्यवसाय सुरू ठेवले. भाजी व्यापाऱ्यांना प्रतिबंधात्मक केलेल्या ठिकाणीच भाजी विक्रेत्यांनी ठाण मांडून व्यवसाय सुरू ठेवला.
धान्य लाईन, भाजी मंडई परिसरात खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठी झुंबड उडाली होती. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगची ‘ऐसी की, तैसी’ झाली. वडगावात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असताना नागरिक मात्र बाजार करण्यासाठी गर्दी करत आहेत. यामुळे कोरोनाचा विस्फोट होऊ शकतो.
कापड व्यापाऱ्यांनी चेंबर ऑफ कॉमर्सने आवाहन केलेय, त्यानुसार अर्ध शटर उघडून दुपारी तीन वाजेपर्यंत व्यवसाय सुरूच ठेवला. यामुळे पालिका व व्यापारी आमनेसामने आले. अखेरीस कोल्हापुरात दोन दिवस व्यवसाय स्थगित ठेवण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार पुन्हा बंद करण्यात आला.
आपल्या आरोग्यासाठी पालिका कर्मचारी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. मात्र, त्यांच्यावर आरोप होत असल्यामुळे आक्रमक भूमिकेऐवजी बोटचेपी भूमिका घेत आहेत. त्यामुळे बाजार भरला आहे; मात्र कोरोनाचा संसर्ग होऊ नये एवढेच म्हणण्याची वेळ आली आहे.
फोटो कॅप्शन
पेठवडगाव : येथील धान्य लाईनमध्ये भाजीपाल व्यावसायिकांनी असे रस्त्यावर ठाण मांडून व्यवसाय सुरू केला होता. (छाया : संतोष माळवदे)