Christmas-सांताक्लॉज, ख्रिसमस ट्री, जिंगल बेल्स, आदींनी सजली बाजारपेठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 11:27 AM2019-12-21T11:27:38+5:302019-12-21T11:30:24+5:30

अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या नाताळ अर्थात ख्रिसमस या ख्रिस्ती बांधवांच्या महत्त्वाच्या सणाची लगबग शहरात सुरू झाली आहे. शहरातील विविध चर्चमध्ये या सणाची तयारी सुरू असून, चर्च विद्युत रोषणाईने झगमगले आहेत. ​​​​​​​

Market surrounded by Santa Claus, Christmas Tree, Jingle Bells, etc. | Christmas-सांताक्लॉज, ख्रिसमस ट्री, जिंगल बेल्स, आदींनी सजली बाजारपेठ

अवघ्या चार दिवसांवर आलेल्या नाताळ सणाच्या तयारीसाठी लागणाऱ्या साहित्याच्या खरेदीला वेग आला आहे. कोल्हापुरातील पापाची तिकटी येथील पानलाईन परिसरातील दुकाने सज्ज झाली आहेत. (छाया : आदित्य वेल्हाळ)

Next
ठळक मुद्देसांताक्लॉज, ख्रिसमस ट्री, जिंगल बेल्स, आदींनी सजली बाजारपेठनागरिकांमध्ये खरेदीचा उत्साह

कोल्हापूर : अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या नाताळ अर्थात ख्रिसमस या ख्रिस्ती बांधवांच्या महत्त्वाच्या सणाची लगबग शहरात सुरू झाली आहे. शहरातील विविध चर्चमध्ये या सणाची तयारी सुरू असून, चर्च विद्युत रोषणाईने झगमगले आहेत.

नाताळ हा आनंद व हर्षोल्हासाचा सण आहे. ‘ख्रिसमस’चा शब्दश: अर्थ आहे ‘क्राइस्ट्स मास’ अर्थात प्रभू येशूचा जन्मदिवस होय. हा सण बुधवारी (दि. २५) साजरा होत आहे. जरी हा ख्रिस्ती बांधवांचा सण असला तरी सर्वधर्मीय नागरिकही आपलाच सण म्हणून तो साजरा करतात.

या सणाच्या निमित्ताने खास ख्रिसमस ट्री, सांताक्लॉजचे कपडे, बक्षिसांची पोटली तर लहानांची नव्हे तर थोरामोठ्यांचेही आकर्षण असते. अजूनही पालक लहान मुलांच्या उशाला त्यांचे आवडते गिफ्ट ठेवतात आणि सांताक्लॉजच्या आठवणीत लहान मुले रंगून जातात.

नाताळ आता चार दिवसांवर आल्याने ख्रिस्ती बांधवांच्या घराघरांत सणाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू झाली आहे. शहरातील विविध चर्चनाही रंगरंगोटी व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सणासाठी बाजारपेठही फुलली आहे.

शहरातील पापाची तिकटी पाईपलाईन, राजारामपुरी, मध्यवर्ती बसस्थानक या महत्त्वाच्या बाजारपेठेत लहान-मोठ्या आकाराचे ख्रिसमस ट्री, जिंगल बेल्स, चांदण्या, सांताक्लॉजचे शर्ट, सांताक्लॉजची टोपी, कपडे, चॉकलेट, कॅडबरी, सजावटीचे बॉल्स, रंगबेरंगी मेणबत्त्या, विशिष्ट आकाराच्या जिंगल बेल्ससह विविध वस्तूंना मोठी मागणी आहे.

नाताळमध्ये डोनेट आणि केकला तर अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे विविध आकारांसह विविध स्वादांतील साधे, पेस्ट्री, चीज, आदी प्रकारच्या केकनी बेकऱ्याही सजल्या आहेत. असे साहित्य केवळ ख्रिस्ती बांधव खरेदी करीत नाहीत, तर अन्यधर्मीय बांधवही अशा साहित्याची खरेदी करताना दिसत आहेत.

साहित्य असे,
ख्रिसमस ट्री- १ ते १२ फूट उंचीचे (किंमत ५० ते ३००० रु.), सांताक्लॉज पुतळा - ३ ते १० हजार, गवानी पुतळा ५० ते २०० रुपये, डेकोरेशन टेडी, जिंगल बेल्स- १० ते ८०० रुपयांपर्यंत, सर्व साहित्य थर्माकोल व प्लास्टिकविरहित बाजारपेठेत उपलब्ध झाले आहे.


ख्रिसमस ट्री, लहानग्यांना खाऊ देणारा सांताक्लॉज कपड्यांसह सजावटीच्या साहित्यालाही मोठी मागणी आहे. विशेष म्हणजे हे पर्यावरणाचा समतोल राखणारे सर्व साहित्य बाजारात उपलब्ध झाले आहे.
- ज्योतिरादित्य साळोखे,
विक्रेते,

 

 

Web Title: Market surrounded by Santa Claus, Christmas Tree, Jingle Bells, etc.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.