आजऱ्याचा शुक्रवारचा आठवडी बाजार बंद राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:24 AM2021-04-08T04:24:05+5:302021-04-08T04:24:05+5:30
जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही विशेष सूचना दिल्या आहेत. तालुक्यातील सर्व गावांतील आठवडा बाजार बंद राहणार आहेत. ...
जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही विशेष सूचना दिल्या आहेत. तालुक्यातील सर्व गावांतील आठवडा बाजार बंद राहणार आहेत. त्याचबरोबर कपडे, भांडी, चप्पल, स्टेशनरी, हॉटेल व्यवसाय बंद राहणार आहे. किराणामाल, बेकरी, भाजीपाला व्यवसाय चालू राहणार असून, या ठिकाणी नागरिकांनी गर्दी करू नये. कोरोनासंदर्भातील सर्वप्रकारच्या नियमांचे पालन करावे. सर्वांनी मास्क वापरणे बंधनकारक आहे. मास्क नसल्यास दंडात्मक कारवाई सुरू आहे. सोमवार ते शुक्रवार रात्री आठ वाजता दुकाने बंद करावीत, तर शनिवार, रविवार १०० टक्के दुकाने बंद राहतील. कोरोनाचा प्रादुर्भाव आजरा तालुक्यात सुरू असून, त्याला वेळीच रोखणे गरजेचे आहे. शासनपातळीवर प्रत्येक गावांमध्ये कोरोना दक्षता समितीमार्फत कोरोना रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, त्याचप्रमाणे शासनाकडून बाजारपेठाही बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.