‘स्वाभिमानी’ करणार उसाचे मार्केटिंग : राजेंद्र गड्यान्नावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 12:17 AM2017-11-08T00:17:16+5:302017-11-08T00:22:35+5:30
गडहिंग्लज : गडहिंग्लज विभागात चांगल्या प्रतीचा ऊस असूनदेखील जिल्ह्यासह सीमाभागातील अन्य साखर कारखान्यांपेक्षा या विभागातील शेतकºयांच्या उसाला कमी दर मिळत आहे.
गडहिंग्लज : गडहिंग्लज विभागात चांगल्या प्रतीचा ऊस असूनदेखील जिल्ह्यासह सीमाभागातील अन्य साखर कारखान्यांपेक्षा या विभागातील शेतकºयांच्या उसाला कमी दर मिळत आहे. त्यामुळे यावर्षी प्रतिटन किमान तीन हजार रुपये दर मिळवून देण्यासाठी ‘स्वाभिमानी’ शेतकरी संघटना उसाचे मार्केटिंग करणार असून, त्यासाठी गावोगावी जनजागृती मेळावे घेणार आहोत, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्यान्नावर यांनी दिली.
जिल्ह्यातील कारखानदार आणि संघटना यांच्यात झालेल्या बैठकीत एफआरपी अधिक २०० रुपये दर देण्यावर एकमत झाले आहे. मात्र, गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यांतील कारखान्यांची ‘एफआरपी’च कमी बसत असल्यामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान होणारआहे. म्हणून शेतकºयांच्या फायद्यासाठीच ‘स्वाभिमानी’ उसाचे मार्केटिंग करणार असून, या सुवर्णसंधीचा फायदा घेण्यासाठी या परिसरातील कारखान्यांनीही ऊस दराच्या स्पर्धेत उतरावे, असे आवाहन केले.
येथील शासकीय विश्रागृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी संघटनेची भूमिका मांडली. यावेळी गडहिंग्लज तालुकाध्यक्ष दिलीप बेळगुद्री, आजरा तालुकाध्यक्ष तानाजीराव देसाई उपस्थित होते. कारखानदारांच्या नादान कारभारामुळेच गडहिंग्लज परिसरातील ऊस उत्पादकांचे नुकसान होत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.गडहिंग्लज परिसरातील ऊस सर्वाधिक साखर उताºयाचा असूनही कमी गाळप यामुळेचया परिसरातील कारखान्यांचीएफआरपी कमी बसते. मात्र, यंदा परिसरात उसाचे उत्पादन चांगले आहे. जिल्हा पातळीवर ठरलेल्यासूत्रानुसार यावर्षी शेतकºयांना दोन पैसे जादा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकºयांनी ऊस तोडीची घाई करू नये, असे आवाहनही गड्यान्नावर यांनी यावेळी केले.
काही कारखाने संपर्कात
गेल्यावर्षीचे गाळप आणि उतारा विचारात घेता गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यांतील सर्व कारखान्यांची ‘एफआरपी’ २५०० ते २६०० रुपयांच्या दरम्यान बसते. मात्र, निपाणीच्या हालसिद्धनाथने ३१५१ दर जाहीर केला असून, संकेश्वरच्या हिरण्यकेशीनेही ३००० रुपये दर दिला आहे. त्यामुळे शेतकºयांचे नुकसान होऊ नये यासाठीच आम्ही उसाचे मार्केटिंग करणार असून, काही कारखाने आपल्या संपर्कात आहेत, असा दावाही गड्यान्नावर यांनी यावेळी केला.