"उदं ग आई उदं" च्या नामगजरात..रेणुकादेवीचा विवाह सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 06:07 PM2019-04-19T18:07:01+5:302019-04-19T18:30:56+5:30

  चैत्रपौर्णिमेचे औचित्य साधत प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या शुभ मुहूर्तावर "शुभमंगल सावधान"च्या मंत्रोच्चारात, "उदं ग आई उदं" च्या नामगजरात भाविकांच्या अलोट गर्दीत ओढ्यावरील रेणुकादेवीच्या मंदिरात महर्षी जमदग्नी व रेणुकादेवीचा विवाह सोहळा पार पडला

Marriage ceremony of "Uday Ga Eye Udden" .. | "उदं ग आई उदं" च्या नामगजरात..रेणुकादेवीचा विवाह सोहळा

"उदं ग आई उदं" च्या नामगजरात..रेणुकादेवीचा विवाह सोहळा

Next
ठळक मुद्देरेणुकादेवीच्या मंदिरात महर्षी जमदग्नीविवाह सोहळ्यानिमित्त महाप्रसादासह धार्मिक उपक्रम देवीच्या जागरणाच्या धार्मिक उपक्रमांने विविध सोहळ्याची सांगता

कळंबा :  चैत्रपौर्णिमेचे औचित्य साधत प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या शुभ मुहूर्तावर "शुभमंगल सावधान"च्या मंत्रोच्चारात, "उदं ग आई उदं" च्या नामगजरात भाविकांच्या अलोट गर्दीत ओढ्यावरील रेणुकादेवीच्या मंदिरात महर्षी जमदग्नी व रेणुकादेवीचा विवाह सोहळा पार पडला विवाह सोहळ्या निमित्त आयोजित महाप्रसादाचा पाच हजारावर भाविकांनी लाभ घेतला शुक्रवारी विवाह सोहळ्याच्या निमित्ताने विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते
          सत्यवती देवीचा पुत्र महर्षी जमदग्नी याने रेणूराजाचा हजारो शूरवीरांच्या सभेत पराभव करीत रेणुराजाची कन्या रेणुकेचे पाणीग्रहण केले तो दिवस चैत्रशुल्क पौर्णिमा होय . या आनंद सोहळ्याची स्मृती म्हणून प्रतिवर्षी चैत्र पौर्णिमेला या विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. यंदाही ओढ्यावरील रेणुका देवीच्या मंदिरात शुक्रवारी हा विवाह सोहळा विविध धार्मिक उपक्रमांसह संपन्न झाला.
            शुक्रवारी रेणुका देवीच्या विवाह सोहळ्यानिमित्त पहाटे देवीची सालंकृत अलंकारिक आकर्षक पूजा मंदिराचे पुजारी मदनआई शांताबाई जाधव व सुनील मेढे यांनी बांधली होती पहाटेच्या काकड आरतीनंतर सकाळी नऊ वाजता देवीची महाआरती करण्यात आली दुपारी साडेबाराच्या गोजर मुहूर्तावर महर्षी जमदग्नी व रेणुका देवीचा विवाह सोहळा भाविकांच्या उपस्थित संपन्न झाला विवाह सोहळा संपन्न होताच देवीचा पालखी प्रदक्षिणा सोहळा पार पडला  दुपारी एक वाजता भाविकांच्या हस्ते महाप्रसाद वाटप करण्यात आले हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला सायंकाळी भाविकांच्या उपस्थितीत देवीच्या जागरणाच्या धार्मिक उपक्रमांने विविध सोहळ्याची सांगता करण्यात आली

Web Title: Marriage ceremony of "Uday Ga Eye Udden" ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.