विवाहितेवर अत्याचार, दोघांना कोठडी, हरीश स्वामीच्या प्रकृतीत सुधारणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 11:15 AM2019-04-25T11:15:57+5:302019-04-25T11:18:55+5:30

पतीच्या व्यवसायासाठी घेतलेल्या ३० हजार रुपयांच्या व्याजापोटी अश्लील व्हिडीओ क्लिप तयार करून ती यूट्यूबवर व्हायरल करण्याची धमकी देऊन विवाहितेवर सामूहिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना बुधवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

Marriage imprisonment, victim's custody, Harish Swami | विवाहितेवर अत्याचार, दोघांना कोठडी, हरीश स्वामीच्या प्रकृतीत सुधारणा

विवाहितेवर अत्याचार, दोघांना कोठडी, हरीश स्वामीच्या प्रकृतीत सुधारणा

googlenewsNext
ठळक मुद्देविवाहितेवर अत्याचार, दोघांना कोठडीहरीश स्वामीसह पीडित विवाहितेच्या प्रकृतीत सुधारणा

कोल्हापूर : पतीच्या व्यवसायासाठी घेतलेल्या ३० हजार रुपयांच्या व्याजापोटी अश्लील व्हिडीओ क्लिप तयार करून ती यूट्यूबवर व्हायरल करण्याची धमकी देऊन विवाहितेवर सामूहिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना बुधवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

संशयित आशिष शिवाजी पाटील (वय २८, रा. रत्नप्रभा प्लाझा, अंबाई डिफेन्स कॉलनी, कोल्हापूर) आणि सद्दाम ऊर्फ आसिफ सत्तार मुल्ला (वय २९, रा. एम. एस. ई. बी. आॅफिसजवळ, यादवनगर, कोल्हापूर) अशी त्यांची नावे आहेत.

विष प्राशन केलेला मुख्य संशयित हरीश विजयकुमार स्वामी याची प्रकृती स्थिर आहे. पीडित विवाहितेची प्रकृती मानसिक धक्क्याने खालावली होती. तिलाही खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. या दोघांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे निरीक्षक संजय मोरे यांनी सांगितले. मंगळवारी (दि. २३) सायंकाळी पाचच्या सुमारास टाकाळा येथील एका कॅफेमध्ये हरीश स्वामीने विष प्राशन केले होते.

संशयितांना अटक करण्यामध्ये टाळाटाळ आणि पीडित विवाहितेला अपमानास्पद वागणूक दिल्याच्या कारणावरून तपास अधिकारी रिझवाना नदाफ यांच्याविरोधात ‘अंनिस’च्या महिला सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्याकडे तक्रार केली होती. नदाफ यांच्याकडील तपास काढून तो उपनिरीक्षक शीलप्रभा पाटील यांच्याकडे दिला आहे.
 

 

Web Title: Marriage imprisonment, victim's custody, Harish Swami

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.