विवाहितेवर अत्याचार, तिघे नराधम पसार-कोल्हापूरमधील खासगी सावकारकीची आणखी जबरदस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 02:12 PM2019-04-20T14:12:26+5:302019-04-20T14:17:36+5:30

पतीच्या व्यवसायासाठी घेतलेल्या ३० हजार रुपयांच्या व्याजापोटी अश्लिल व्हिडीओ क्लीप तयार करुन ती यूट्यूबर व्हायरल करण्याची धमकी देवून विवाहीतेवर सामुहीक अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघा नराधमांवर शाहुपूरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Married to Marriage, Three Persons Practices - Forcibly Private Seekers In Kolhapur | विवाहितेवर अत्याचार, तिघे नराधम पसार-कोल्हापूरमधील खासगी सावकारकीची आणखी जबरदस्ती

विवाहितेवर अत्याचार, तिघे नराधम पसार-कोल्हापूरमधील खासगी सावकारकीची आणखी जबरदस्ती

Next
ठळक मुद्देपोलीसांनी शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास तिघांच्याही घरी धाड टाकून शोध घेण्याचा प्रयत्न केला असता ते पसार व्याजापोटी संशयित स्वामी याने पिडिती विवाहीतेवर वारंवार अत्याचार केला.

कोल्हापूर : पतीच्या व्यवसायासाठी घेतलेल्या ३० हजार रुपयांच्या व्याजापोटी अश्लिल व्हिडीओ क्लीप तयार करुन ती यूट्यूबर व्हायरल करण्याची धमकी देवून विवाहीतेवर सामुहीक अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघा नराधमांवर शाहुपूरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. संशयित हरीश स्वामी (२२, दत्त मंदिर जवळ, रुईकर कॉलनी, कोल्हापूर), आशिष पाटील (२८, रा. सायबर चौक, राजारामपुरी), सदाम मुल्ला (२९, यादवनगर, कोल्हापूर), अशी त्यांची नावे आहेत. पोलीसांनी शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास तिघांच्याही घरी धाड टाकून शोध घेण्याचा प्रयत्न केला असता ते पसार झाले आहेत. मोबाईल बंद असल्याने त्यांचे लोकेशन मिळून येत नाही.

सहा महिन्यापूर्वी प्रेम विवाह झालेल्या पिडित विवाहीतेच्या पतीने क्लब सुरु करण्यासाठी मित्र हरीश स्वामी याचेकडून ३० हजार रुपये व्याजाने घेतले होते. व्याजापोटी संशयित स्वामी याने पिडिती विवाहीतेवर वारंवार अत्याचार केला. त्यानंतर कळंबा येथील तपोवन मैदानावर कारमध्येही अत्याचार केला. संशयित स्वामी, त्याचे मित्र आशिष पाटील, सदाम मुल्ला यांनी तुझी अश्लिल व्हिडीओ क्लीप तयार करुन ती यूट्यूबर व्हायरल करण्याची धमकी देवून तिचेवर सामुहीक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. तिघेही संशयित सराईत आहेत. गुन्हा दाखल झालेची माहिती समजताच ते पसार झाले आहेत. पोलीसांनी त्यांच्या घराची झडती घेतली असता ते मिळून आले नाहीत. त्यांचे मोबाईल बंद असल्याने लोकेशन मिळू शकलेले नाही. पिडीतीचा, तिच्या पतीचा पोलीसांनी जबाब घेतला आहे. तिच्या रुईकर कॉलनी येथील घराची पाहणी करुन पंचनामा सरकारी पंचासमक्ष शनिवारी पोलिसांनी केला. सहायक पोलीस निरीक्षक रिझवाना नदाम तपास करीत आहेत.


 

पीडित विवाहितेची फिर्याद घेतली आहे. तिघा संशयित खासगी सावकारांवर गुन्हा दाखल केला आहे. संशयितांच्या लवकरचं मुसक्या आवळू.
प्रेरणा कट्टे : शहर पोलीस उपअधीक्षक
 


 

Web Title: Married to Marriage, Three Persons Practices - Forcibly Private Seekers In Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.