कोरोना नियंत्रणासाठी मार्शल पथक बेळगावात दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:25 AM2021-04-22T04:25:29+5:302021-04-22T04:25:29+5:30
बेळगाव जिल्ह्यातील ३३ स्थानिक स्वराज्य संस्थांत ते कार्यरत राहणार असून नियमावलींच्या कडक अंमलबजावणीचे काम मार्शल पथक करणार आहे. सार्वजनिक ...
बेळगाव जिल्ह्यातील ३३ स्थानिक स्वराज्य संस्थांत ते कार्यरत राहणार असून नियमावलींच्या कडक अंमलबजावणीचे काम मार्शल पथक करणार आहे.
सार्वजनिक ठिकाणी घोळक्याने कोणी जमू नये, बाजारात सामाजिक अंतर राखणे मास्कचा वापर करणे आणि त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे, त्यांची कोरोना तपासणी करणे, दुकानदारांनी दुकानासमोर तीन फूट अंतरावर दोरीने अडथळा निर्माण करणे, विना मास्क फिरणाऱ्यांवर महापालिका व्याप्तीत २५० तर इतर ठिकाणी १०० रुपयांचा दंड आकारणे, लग्न आणि इतर समारंभात ५० टक्के लोकांचा सहभाग ठेवणे, परवानगीशिवाय लग्नाचे आयोजन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे, अंत्यविधीसाठी ५० जणांना परवानगी देणे, खुल्या जागेत व्यापार करणाऱ्या व्यावसायिकांना सोशल डिस्टन्सिंगबाबत सूचना देणे अशा जबाबदाऱ्या मार्शल पथक पार पाडणार आहे.