शिवशंभू भक्तांकडून ‘मशाल यात्रा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:42 AM2021-03-13T04:42:24+5:302021-03-13T04:42:24+5:30

कोल्हापूर : छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहरातील शिवशंभू भक्तांच्या वतीने गुरुवारी शहरातून मशाला यात्रा काढली. १ फेब्रुवारीपासून सुरू ...

'Mashal Yatra' by Shiv Shambhu devotees | शिवशंभू भक्तांकडून ‘मशाल यात्रा’

शिवशंभू भक्तांकडून ‘मशाल यात्रा’

googlenewsNext

कोल्हापूर : छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहरातील शिवशंभू भक्तांच्या वतीने गुरुवारी शहरातून मशाला यात्रा काढली. १ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या बलिदान मासची सांगता पापाची तिकटी येथील संभाजी महाराज यांच्या स्मारक येथे पणत्या लावून ध्येय मंत्र, प्रेरणा मंत्र आणि पूजेने झाली.

शहरातील ४० ते ५० शिवशंभू भक्त एकत्र येऊन संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथिनिमित्त विविध उपक्रम करतात. १ फेब्रुवारी ते ११ मार्चदरम्यान त्यांनी पायात चप्पल न घालणे, गोडधोड न खाणे, शुभ कार्यक्रमांना न जाणे अशा पद्धतीने बलिदान मास केला. संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांनी गुरुवारी रुईकर कॉलनी येथील संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला प्रार्थना करून ज्योतीचे प्रज्वलन केले. यानंतर शांततेत मशाला यात्रा सुरू झाली. रेल्वे स्टेशन रोड, व्हिनस कॉर्नर, दसरा चौक, बिंदू चौक, शिवाजी चौकमार्गे पापाची तिकटी येथे यात्रेची सांगता झाली. पापाची तिकटी येथील संभाजी महाराज यांच्या स्मारकाजवळ पूजा करण्यात आली.

फोटो : ११०३२०२१ कोल मशाला यात्रा न्यूज

ओळी : कोल्हापुरातील शिवशंभू भक्तांच्या वतीने गुरुवारी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहरातून मशाला यात्रा काढण्यात आली. पापाची तिकटी येथे त्याची सांगता झाली.

Web Title: 'Mashal Yatra' by Shiv Shambhu devotees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.