मास्क, सॅनिटायझर-सामाजिक अंतराची आजही गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:28 AM2021-09-06T04:28:04+5:302021-09-06T04:28:04+5:30
चंदगड : कोरोना महामारीमुळे शारीरिक, मानसिक व सामाजिक स्वास्थ्य बिघडले आहे. विष्णूच्या अवताराप्रमाणे कोरोनाची लक्षणे बदलत असून, त्यांना ...
चंदगड : कोरोना महामारीमुळे शारीरिक, मानसिक व सामाजिक स्वास्थ्य बिघडले आहे. विष्णूच्या अवताराप्रमाणे कोरोनाची लक्षणे बदलत असून, त्यांना डेल्टाप्लस, ओमेगा, झिका या नावाने ओळखले जात आहे. त्यामुळे मास्क, सॅनिटायझर व सामाजिक अंतर या त्रिसुत्रीचा वापर करून कोरोनावर मात करु शकतो, असे मत दौलत साखर कारखान्याचे डॉ. जे. एच. जाधव यांनी व्यक्त केले.
हलकर्णी येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात स्टाफ ॲकॅडमी समितीने आयोजित केलेल्या ‘विषाणूजन्य आजार व आरोग्य जनजागृती’ यावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी दौलत विश्वस्त संस्थेचे उपाध्यक्ष संजय पाटील होते. जाधव म्हणाले, आहार, विहार व योगाचा उपयोग करून या महामारीवर मात करा.
यावेळी प्राचार्य पी. ए. पाटील, डॉ. आय. आर. जरळी उपस्थित होते. प्रा. यु. एस. पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रा. आर. बी. गावडे यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा. एस. डी. तावदारे यांनी आभार मानले.
फोटो ओळी : हलकर्णी (ता. चंदगड) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात डॉ. जे. एच. जाधव यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रा. यु. एस. पाटील, डॉ. आय. आर. जरळी, प्रा. बागवान उपस्थित होते.
क्रमांक : ०५०९२०२१-गड-०५
.