kolhapur: पन्हाळ्याच्या जंगल क्षेत्रात भीषण आग, चार हेक्टरपर्यंतची वनसंपदा खाक video
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 07:45 PM2023-03-29T19:45:52+5:302023-03-29T19:50:41+5:30
धुराचे मोठे लोट पसरले
पन्हाळा: पन्हाळ्याच्या पुर्व तटबंदी व त्याखालील जंगल क्षेत्रात आज, बुधवारी सकाळी भीषण आग लागली. या आगीत सुमारे अडीच ते चार हेक्टर क्षेत्रातील वनसंपदा जळून खाक झाली. पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली. यावेळी धुराचे मोठे लोट पसरले होते.
सज्जा कोठी परिसरातील तटबंदी व नायकीणीचा सज्जाची तटबंदी परिसरात आगीला सुरुवात झाली. वाऱ्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले. आपटी गावातील रहिवासी क्षेत्रात आग आल्याने अग्निशमन दलाच्या जवानांनी व आपटी गावातील नागरिकांनी तटबंदी खाली उतरून आग विझवण्याचा प्रयत्न केला. यात पन्हाळा नगर पालिका मुकादम जयवंत कांबळे,मनसे पन्हाळा शहर अध्यक्ष गणेश भोसले, सुरज भोसले, ओंकार कापसे, संदीप पाटील, वन कर्मचारी दिलीप वाघवेकर यांनी सहकार्य केले.
आगीच्या भक्ष्यस्थानी मोठ्या प्रमाणात पक्षी, सरपटणारे प्राणी व त्या परीसरातील बिबट्याचा रहिवास असलेले ठिकाण पुर्णपणे नष्ट झाले. आग नेमकी कशामुळे लागली याबाबत अद्याप स्पष्टता झाली नाही.