वारणा दूध संघामार्फत स्तनदाह नियंत्रण कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:22 AM2021-07-25T04:22:22+5:302021-07-25T04:22:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वारणानगर : येथील वारणा दूध संघामार्फत सुप्ता अवस्थेतील स्तनदाह (मस्टायटीस) नियंत्रण कार्यक्रम वारणा संघाच्या कार्यक्षेत्रात मोठ्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
वारणानगर : येथील वारणा दूध संघामार्फत सुप्ता अवस्थेतील स्तनदाह (मस्टायटीस) नियंत्रण कार्यक्रम वारणा संघाच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येणार असल्याची माहिती वारणा दूध संघाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे यांनी दिली.
आधुनिक दुग्ध व्यवसाय करत असताना दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामध्ये जनावरांच्या आरोग्य विषयाच्या बऱ्याच समस्या आहेत. त्यातील स्तनदाह (मस्टायटीस) हा कासेचा आजार सर्वात जास्त प्रमाणात असून, दूध उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. अशा जनावरांवर वेळेत निदान व उपचार झाल्यास जनावरांचे आरोग्य चांगले राहून दूधवाढीस मदत होणार असल्याचे कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी सांगितले.
वारणा दूध संघाचे पशूवैद्यकीय विभागामार्फत औषध उपचार व रोग नियंत्रण संदर्भात दूध उत्पादकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
संघाचे उपाध्यक्ष एच.आर. जाधव, कार्यकारी संचालक मोहन येडूरकर, संचालक अभिजीत पाटील, शिवाजी कापरे, शिवाजी मोरे, राजवर्धन मोहिते, शिवाजी जंगम, महेंद्र शिंदे, ॲड. एन.आर. पाटील, माधव गुळवणी, दीपक पाटील, अरुण पाटील, लालासो पाटील, चंद्रशेखर बुवा, व्ही.टी.पाटील,
के.आर.पाटील,डॉ.मिलिंद हिरवे, मयुर पाटील,अकाउंट्सचे सुधीर कामेरीकर आदी उपस्थित होते.
.......
.
फोटो ओळी-वारणा दूध संघामार्फत सुप्ता अवस्थेतील स्तनदाह नियंत्रण कार्यक्रम वारणा संघाच्या कार्यक्षेत्रात राबविण्यात येणार आहे. यावेळी संघाचे उपाध्यक्ष एच.आर.जाधव, कार्यकारी संचालक मोहन येडूरकर, सर्व संचालक व पशू वैद्यकीय अधिकारी.