टेंबलाईवाडीत माजी नगरसेवकांत सामना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:22 AM2021-03-15T04:22:17+5:302021-03-15T04:22:17+5:30
प्रभाग क्रमांक २१ टेबलाईवाडी नगरसेवक-कमलाकर भोपळे भाजप ताराराणी मागील आरक्षण-अनुसूचित जाती सध्याचे आरक्षण-नागरिकाचा मागास प्रवर्ग महिला दीपक जाधव कदमवाडी ...
प्रभाग क्रमांक २१ टेबलाईवाडी
नगरसेवक-कमलाकर भोपळे भाजप ताराराणी
मागील आरक्षण-अनुसूचित जाती
सध्याचे आरक्षण-नागरिकाचा मागास प्रवर्ग महिला
दीपक जाधव
कदमवाडी : टेंबलाईवाडी प्रभागात सध्या भाजप ताराराणीचे वर्चस्व असून, येथे कमलाकर भोपळे हे प्रतिनिधित्व करत आहेत. असगामी निवडणुकीसाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला असे आरक्षण येथे पडले व सभागृहात वारंवार विविध विषयांवर आवाज उठवणारे आणि प्रभागात लहानांपासून मोठ्यापर्यंतचे भोपळे मामा यावेळेस निवडणूक रिंगणात नसणार हे स्पष्ट झाले. या प्रभागात माजी पदाधिकारी व माजी नगरसेवक पुन्हा आमने-सामने येणार आहेत.
टेंबलाईवाडी हा प्रभाग लक्ष्मी काॅलनी, साईनाथ काॅलनी, श्रीराम काॅलनी, सम्राट काॅलनी, रेल्वे चाळ ते स्वामी समर्थ काॅलनी असा असून, विधानसभेला हा प्रभाग सतेज पाटील यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहतो. मात्र महापालिका निवडणुकीत मात्र अंतर्गत गटातटामुळे काँग्रेसच्या उमेदवार विजयापर्यंत पोचत नाही. या प्रभागात सलग तीन वेळेस प्रतिनिधित्व केलेले काटे पती-पत्नीमधून पुन्हा रोहिणी काटे या राष्ट्रवादीकडून इच्छुक आहेत. २०१०च्या निवडणुकीत काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेले व उपमहापौरपद भूषविलेले मोहन गोंजारे यांच्या पत्नी संगीता गोजारे भाजपकडून निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. मोहन गोंजारे हे गत निवडणुकीत सतेज पाटील यांच्या बरोबर नव्हते. २००० साली काँग्रेसकडून लढलेले दीनानाथ कदम यांच्या पत्नी नीलिमा कदम, सुरेश काटे यांच्या पत्नी काँग्रेसकडून इच्छुक आहेत.
एकंदरीत आरक्षण बदलामुळे पुन्हा पारंपरिक प्रतिस्पर्धी आमने-सामने येणार हे निश्चित आहे.
---------
सोडवलेले प्रश्न
रेल्वेलाइन जोशी गल्ली, सम्राट काॅलनीमध्ये सार्वजनिक शौचालय सुविधा.
रेल्वेमार्ग परिसरात गटर्स
भागातील रस्ते पूर्ण
गटर्स पूर्ण
सांडपाण्याचा निचरा करण्यात यशस्वी
--------
अपूर्ण कामे
भागातील पाणीटंचाई
काही ठिकाणी कायम
अपूर्ण रस्ते
वीज व्यवस्था अपूर्ण
कोट...
गेल्या पाच वर्षांत शक्य तितकी कामे पूर्ण करण्यात आली असून, सर्वांत महत्त्वाचे ५० वर्षांपासून रेल्वेमार्ग परिसरात शौचालय नव्हते ते काम पूर्ण झाले. काही कामे शिल्लक आहेत ती लवकरच पूर्ण होतील. याकाळात मला भागातील नागरिकांकडून मोलाचे पाठबळ मिळाले.
कमलाकर भोपळे,
नगरसेवक
गत निवडणुकीतील मतदान
कमलाकर भोपळे १,२२९ विजयी (भाजप ताराराणी)
बाळासाहेब ऐवळे १२०६ अपक्ष
अनिल शिंदे ८२७ काँग्रेस
अमोल मधाळे ३१४ राष्ट्रवादी
बाळासो कांबळे १६६ शिवसेना.
--------
फोटो ओळ. प्रभाग २१ टेबलाईवाडी मध्ये विद्यमान नगरसेवकांनी रस्ते काँक्रिटीकरण केले आहेत.
(छाया-दीपक जाधव)
-