रुकडीकर ट्रस्टतर्फे पूरग्रस्तांना प्रापंचिक साहित्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:27 AM2021-08-12T04:27:23+5:302021-08-12T04:27:23+5:30
कोल्हापूर : गगनबावडा तालुक्यातील २५ हून अधिक गावांतील पुराचा फटका बसलेल्या ग्रामस्थांना येथील श्री सद्गुरू ...
कोल्हापूर : गगनबावडा तालुक्यातील २५ हून अधिक गावांतील पुराचा फटका बसलेल्या ग्रामस्थांना येथील श्री सद्गुरू विश्वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्ट यांच्यावतीने प्रापंचिक साहित्याचे वितरण करण्यात आले. त्यांना टीम निरंजन आणि क्विक हिल फाउंडेशन यांचे सहकार्य लाभले.
चारशेहेहून अधिक कुटुंबांना प्रत्येकी तीन ब्लॅंकेट, दोन चटई अशा एकूण ८०० चटई आणि १३०० ब्लॅँकेटचे वितरण करण्यात आले. गगनबावड्यातील नागरिकांची प्रतिकारशक्ती वाढावी यासाठी ४० हजार स्ट्रीप्स रस माधव वटी औषधाचेही वाटप करण्यात आले. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते आणि ट्रस्टचे अध्यक्ष आनंदनाथ सांगवडेकर, विश्ववती चिकित्सालयाचे अध्यक्ष निरंजनदास सांगवडेकर यांच्या उपस्थितीमध्ये उपक्रम झाला. गगनबावडा गटविकास अधिकारी माधुरी परीट, ग्रामविस्तार अधिकारी टोणपे, दाभाडे, गायकवाड यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. याच संस्थांच्यावतीने पुण्यातील मुरलीधर लायगुडे रुग्णालयाच्या कोविड सेंटरला ऑक्सिजन मास्क, डिस्पोजेबल सिरिंज, पाच हजार ग्लोव्हज यासह आवश्यक वस्तू प्रदान करण्यात आल्या. यावेळी डॉ. तुषार सौदंणकर, डॉ. अभय जमदग्नी, डॉ. राहुल शेलार, क्विक हिल फाऊंडेशनच्या श्रीमती काटकर उपस्थित होत्या.