रेंदाळमधील ‘त्या’ शाळेतील साहित्य गायब नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:24 AM2021-03-18T04:24:29+5:302021-03-18T04:24:29+5:30

कोल्हापूर : रेंदाळ (ता. हातकणंगले) येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूलमधील इमारत दुरुस्तीनंतरचे पाच लाखांचे ...

The material of 'that' school in Rendal is not missing | रेंदाळमधील ‘त्या’ शाळेतील साहित्य गायब नाही

रेंदाळमधील ‘त्या’ शाळेतील साहित्य गायब नाही

Next

कोल्हापूर : रेंदाळ (ता. हातकणंगले) येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूलमधील इमारत दुरुस्तीनंतरचे पाच लाखांचे लोखंडी साहित्य (स्क्रॅप) गायब झालेले नाही, ते शिल्लक असल्याचा अहवाल संस्थेचे आर्किटेक्ट यांनी दिला.

या अहवालानुसार संस्थेने या साहित्याबाबत संस्था प्रतिनिधी आणि रेंदाळमधील ग्रामस्थ यांची दिनांक २ मार्च रोजी सहविचार सभा घेतली. त्यात ते साहित्य गायब झाले नसल्याची बाब सर्व ग्रामस्थांच्या निदर्शनास आली. त्यामुळे शाळेचे आजी-माजी मुख्याध्यापकांनी संगनमताने कोणताही गैरव्यवहार अथवा अपहार केल्याचे दिसून आले नाही. या लोखंडी साहित्याची विक्री करुन येणारी रक्कम शाळेच्या बॅंक खात्यावर भरुन त्यातून शाळेसाठी बेंच खरेदी करण्याचा निर्णय या सहविचार सभेत घेण्यात आला. त्यानुसार दिनांक ३ मार्च रोजी या साहित्याची विहीत निविदा पद्धतीने विक्री करुन जमा झालेली रक्कम शाळेच्या बॅंक खात्यामध्ये जमा केली असल्याची माहिती संस्थेने पत्रकाद्वारे दिली आहे.

Web Title: The material of 'that' school in Rendal is not missing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.