राजू आवळे यांच्याकडून आरोग्य केंद्रांना ८५ लाख रुपयांचे साहित्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:22 AM2021-05-23T04:22:58+5:302021-05-23T04:22:58+5:30
पेठवडगाव : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता पाहता, सरकारने आमदारांना आपला निधी कोविड उपचारांच्या सुविधांसाठी वापरण्यास सांगितले होते. त्यानुसार हातकणंगलेचे ...
पेठवडगाव : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता पाहता, सरकारने आमदारांना आपला निधी कोविड उपचारांच्या सुविधांसाठी वापरण्यास सांगितले होते. त्यानुसार हातकणंगलेचे आमदार राजू आवळे यांनी ८५ लाख रुपयांचे आधुनिक साहित्य तालुक्यातील आरोग्य केंद्रांना दिले आहे. हातकणंगले नगर पंचायतीला एक रूग्णवाहिका देण्यात आली. आमदार आवळे यांनी पहिल्या कोरोना लाटेवेळी ५० लाखांचे साहित्य दिले होते. त्यांनी आतापर्यंत सर्वाधिक दीड कोटींचा निधी कोविड उपचारांसाठी दिला आहे.
आमदार राजू आवळे यांनी मतदार संघातील प्राथमिक आरोग्य केंद्र व कोविड सेंटरची गरज लक्षात घेत, ८५ लाखांचे साहित्य आमदार निधीतून खरेदी केले आहे. आवळे यांनी पारगाव ग्रामीण रुग्णालय कोविड सेंटर, घोडावत कोविड सेंटरसह प्राथमिक आरोग्य केंद्रात हे साहित्य दिले आहे.