पाचवी, आठवीच्या ६५० विद्यार्थ्यांनी दिली गणित परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 10:23 AM2020-02-03T10:23:39+5:302020-02-03T10:25:12+5:30
शहरातील देशभूषण हायस्कूल आणि नेहरू हायस्कूल या केंद्रावर दुपारी बारा ते दोन यावेळेत परीक्षा घेण्यात आली. त्यासाठी असलेल्या प्रश्नपत्रिकेत शंभर गुणांसाठी दहा प्रश्न विचारले होते. त्यांचे स्वरूप हे विस्तारीत होते. इयत्ता पाचवीच्या ३८४, तर आठवीच्या २६६ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी परीक्षा दिली.
कोल्हापूर : इयत्ता पाचवी आणि आठवीच्या एकूण ६५० विद्यार्थी-विद्यार्थिनींनी रविवारी दुपारी गणित प्रज्ञाशोध परीक्षा दिली. महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक महामंडळ आणि कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ गणित विषय समितीच्यावतीने परीक्षा घेण्यात आली.
शहरातील देशभूषण हायस्कूल आणि नेहरू हायस्कूल या केंद्रावर दुपारी बारा ते दोन यावेळेत परीक्षा घेण्यात आली. त्यासाठी असलेल्या प्रश्नपत्रिकेत शंभर गुणांसाठी दहा प्रश्न विचारले होते. त्यांचे स्वरूप हे विस्तारीत होते. इयत्ता पाचवीच्या ३८४, तर आठवीच्या २६६ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी परीक्षा दिली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे शंभर विद्यार्थी वाढले आहेत.
यंदाच्या परीक्षेसाठी एक बाह्य, तर दोन अंतर्गत निरीक्षक आणि १५ पर्यवेक्षक कार्यरत होते. साधारणत: मार्चच्या पहिल्या आठवड्यात या परीक्षेचा निकाल जाहीर होईल, अशी माहिती जिल्हा मुख्याध्यापक संघ गणित विषय समितीचे अध्यक्ष जे. के. पाटील यांनी दिली. दरम्यान, सुटीचा दिवस असून देखील या परीक्षेमुळे केंद्र असलेल्या शाळांचा परिसर विद्यार्थी आणि पालकांच्या गर्दीने फुलला होता.