Shivrajyabhishek : शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी कोल्हापूरचे मावळे रायगडला रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 06:03 PM2021-06-04T18:03:33+5:302021-06-04T18:06:36+5:30

Shivrajyabhishek Kolhpaur : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीने यावर्षीचा शिवराज्याभिषेकदिनाचा सोहळा शनिवारी आणि रविवारी दुर्गराज रायगडावर मोजक्या वीस जणांच्या उपस्थितीत साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या सोहळ्यासाठी कोल्हापूरचे हे मावळे शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास रवाना झाले.

Mavale of Kolhapur leaves for Raigad for Shiv Rajyabhishek ceremony | Shivrajyabhishek : शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी कोल्हापूरचे मावळे रायगडला रवाना

 कोल्हापुरात शुक्रवारी चित्रकार युवराज जाधव यांनी साकारलेल्या शिवछत्रपतींच्या तैलचित्राचे अनावरण युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांच्या हस्ते न्यू पॅॅलेस येथे झाले. यावेळी शेजारी डावीकडून अभिजीत तिवले, राम यादव, चित्रकार जाधव उपस्थित होते. (छाया : आदित्य वेल्हाळ)

googlenewsNext
ठळक मुद्दे शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी कोल्हापूरचे मावळे रायगडला रवाना वीस जणांचा समावेश : शिवछत्रपतींच्या सिंहासनाधिष्ठित चित्राचे अनावरण

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीने यावर्षीचा शिवराज्याभिषेकदिनाचा सोहळा शनिवारी आणि रविवारी दुर्गराज रायगडावर मोजक्या वीस जणांच्या उपस्थितीत साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या सोहळ्यासाठी कोल्हापूरचे हे मावळे शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास रवाना झाले.

जुना राजवाडा येथून खासगी बसमधून महोत्सव समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत, सदस्य संजय पवार, हेमंत साळोखे, विनायक फाळके, प्रसन्न मोहिते, सागर पाटील, राहुल शिंदे, राम यादव, सुखदेव गिरी, प्रविण हुबाळे, सुजित जाधव, अजय पाटील, उदय बोंद्रे, भरत कांबळे, दिपक सपाटे, दया हुबाळे, अमर जुगर, संतोष शिनगारे रवाना झाले. यावेळी उदय घोरपडे, बाबा महाडिक, आदी उपस्थित होते.

दरम्यान, गिरगाव (ता. करवीर) येथील चित्रकार युवराज जाधव यांनी शिवराज्याभिषेक सोहळानिमित्त शिवछत्रपतींचे सिंहासनाधिष्ठित पाच फूट उंचीचे तैलचित्र साकारले आहे. त्याचे अनावरण युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांनी न्यू पॅॅलेस येथे केले.

यावेळी चित्रकार जाधव, राम यादव, अभिजीत तिवले उपस्थित होते. चित्रकार जाधव हे तपोवन हायस्कूलमध्ये कलाशिक्षक आहेत. त्यांनी शिवछत्रपतींच्या समकालीन चित्रांचा अभ्यास करून हे तैलचित्र साकारले आहे. त्यासाठी त्यांना सहा महिने लागली.
 

Web Title: Mavale of Kolhapur leaves for Raigad for Shiv Rajyabhishek ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.