शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी कोल्हापूरचे मावळे ‘रायगड’ला रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:18 AM2021-06-05T04:18:09+5:302021-06-05T04:18:09+5:30

जुना राजवाडा येथून खासगी बसमधून सोहळ्यासाठीचे आवश्यक साहित्य घेवून हे मावळे रायगडकडे निघाले. त्यामध्ये महोत्सव समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत, ...

Mavale of Kolhapur leaves for Raigad for Shiv Rajyabhishek ceremony | शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी कोल्हापूरचे मावळे ‘रायगड’ला रवाना

शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी कोल्हापूरचे मावळे ‘रायगड’ला रवाना

googlenewsNext

जुना राजवाडा येथून खासगी बसमधून सोहळ्यासाठीचे आवश्यक साहित्य घेवून हे मावळे रायगडकडे निघाले. त्यामध्ये महोत्सव समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत, सदस्य संजय पवार, हेमंत साळोखे, विनायक फाळके, प्रसन्न मोहिते, सागर पाटील, राहुल शिंदे, राम यादव, सुखदेव गिरी, प्रवीण हुबाळे, सुजित जाधव, अजय पाटील, उदय बाेंद्रे, भरत कांबळे, दीपक सपाटे, दया हुबाळे, अमर जुगर, संतोष शिनगारे रवाना झाले. यावेळी उदय घोरपडे, बाबा महाडिक, आदी उपस्थित होते. दरम्यान, गिरगाव (ता. करवीर) येथील चित्रकार युवराज जाधव यांनी शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त शिवछत्रपतींचे सिंहासनाधिष्ठित पाच फूट उंचीचे तैलचित्र साकारले आहे. त्याचे अनावरण युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांनी न्यू पॅॅलेस येथे केले. यावेळी चित्रकार जाधव, राम यादव, अभिजित तिवले उपस्थित होते. चित्रकार जाधव हे तपोवन हायस्कूलमध्ये कलाशिक्षक आहेत. त्यांनी शिवछत्रपतींच्या समकालीन चित्रांचा अभ्यास करून हे तैलचित्र साकारले आहे. त्यासाठी त्यांना सहा महिने लागली.

चौकट

शिवभक्तांनी घरी सोहळा साजरा करावा

कोरोनाच्या संकटामुळे मोजक्या मावळ्यांच्या उपस्थितीत रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होईल. खासदार संभाजीराजे यांनी केलेल्या आवाहनानुसार शिवभक्तांनी घरात राहून सोहळा साजरा करावा, असे फत्तेसिंह सावंत यांनी सांगितले.

फोटो (०४०६२०२१-कोल-शिवाजी महाराज चित्र अनावरण) : कोल्हापुरात शुक्रवारी चित्रकार युवराज जाधव यांनी साकारलेल्या शिवछत्रपतींच्या तैलचित्राचे अनावरण युवराज्ञी संयोगीताराजे छत्रपती यांच्या हस्ते न्यू पॅॅलेस येथे झाले. यावेळी शेजारी डावीकडून अभिजित तिवले, राम यादव, चित्रकार जाधव उपस्थित होते. (छाया : आदित्य वेल्हाळ)

Web Title: Mavale of Kolhapur leaves for Raigad for Shiv Rajyabhishek ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.