जगदंबा तलवारीसाठी पन्हाळगडावर शिवदुर्ग संवर्धनच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 05:05 PM2021-03-29T17:05:49+5:302021-03-29T17:29:52+5:30

History Kolhpaur- शिवछत्रपतींची इंग्लंडमधील जगदंबा तलवार भारतात परत आणण्याबाबत शासन जोपर्यंत गांभीर्याने विचार करत नाही, आणि तलवारीबाबत ठोस लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत शिवदुर्ग संवर्धनचे मावळे येथून जाणार नाही असा निर्धार करत सोमवारी सुमारे पाऊणशे कार्यकर्त्यांनी ऐतिहासिक पन्हाळगडावरील सज्जाकोठी येथे आंदोलन केले. 

Mavals of Shivdurg Sanvardhan locked up Sajjakothi in Panhala | जगदंबा तलवारीसाठी पन्हाळगडावर शिवदुर्ग संवर्धनच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन

जगदंबा तलवारीसाठी पन्हाळगडावर शिवदुर्ग संवर्धनच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन

Next
ठळक मुद्देजगदंबा तलवारीसाठी पन्हाळगडावर शिवदुर्ग संवर्धनच्या कार्यकर्त्यांचे आंदोलनपन्हाळ्यातील सज्जाकोठी येथे घेतले कोंडुन

पन्हाळा : शिवछत्रपतींची इंग्लंडमधील जगदंबा तलवार भारतात परत आणण्याबाबत शासन जोपर्यंत गांभीर्याने विचार करत नाही, आणि तलवारीबाबत ठोस लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत शिवदुर्ग संवर्धनचे मावळे येथून जाणार नाही असा निर्धार करत सोमवारी सुमारे पाऊणशे कार्यकर्त्यांनी ऐतिहासिक पन्हाळगडावरील सज्जाकोठी येथे आंदोलन केले. 

करवीर छत्रपती घराण्याकडे असणारी शिवछत्रपतींची जगदंबा नावाची तलवार आज इंग्लडच्या राणीच्या व्यक्तिगत संग्रहात असणाऱ्या रॉयल कलेक्शन ट्रस्टमध्ये सेंट जेम्स पॅलेस येथे आहे. इंग्लडचा तत्कालिन प्रिन्स ऑफ वेल्स (सातवा एडवर्ड) भारत भेटीवर आला असता सन १८७५-७६ मध्ये त्यांना ही तलवार कोल्हापूर छत्रपतींच्या गादीवर छत्रपती महाराज (चौथे) यांनी भेट म्हणून दिली होती. ही इंग्लंड येथे असणारी जगदंबा तलवार भारतात परत यावी यासाठी शिवदुर्ग संवर्धनच्या कार्यकर्त्यांनी ऐतिहासिक पन्हाळगडावरील सज्जाकोठी येथे आंदोलन केले. 

आंदोलनचा एक भाग म्हणुन पन्हाळा येथील शिवाजी महाराजांच्या मंदिरात जावुन त्यांचे आशिर्वाद घेवुन कार्यकर्त्यांनी हे आंदोलन सुरु केले असलेचे संवर्धनचे हर्षल सुर्वे यांनी सांगीतले. मोडीलिपी तज्ञ अमित आडसुळ, राम यादव, रवी कदम, फिरोजखान उस्ताद, सचीन तोडकर, किरण चव्हाण, आमृता सावेकर, हरीश पटेल, योगेश नागांवकर आदी सुमारे पाऊणशे शिवप्रेमी कार्यकर्ते, पोलीस व पुरातत्वचे कर्मचारी, प्रशासनाबरोबर संवाद साधत आहेत.
 

Web Title: Mavals of Shivdurg Sanvardhan locked up Sajjakothi in Panhala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.