अलमट्टीतून सर्वाधिक दोन लाख क्युसेस पाण्याचा विसर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:17 AM2021-07-24T04:17:12+5:302021-07-24T04:17:12+5:30
गेले दोन दिवस जलाशय परिसरात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे कृष्णा खोऱ्यातील कर्नाटक हद्दीत असणाऱ्या पाचही जलाशयांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. ...
गेले दोन दिवस जलाशय परिसरात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे कृष्णा खोऱ्यातील कर्नाटक हद्दीत असणाऱ्या पाचही जलाशयांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. या सर्व जलाशयातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. अलमट्टी जलाशयातून सर्वाधिक २ लाख क्युसेस इतका पाण्याचा विसर्ग होत आहे.
कृष्णा खोऱ्याच्या कर्नाटक व्याप्तीत येणाऱ्या जलाशयातील पाणीसाठा व पाणी पातळीचा शुक्रवार, २३ जुलै रोजी सकाळी ८ वाजता नोंद झालेला तपशील पुढील प्रमाणे आहे. हिडकल जलाशय : एकूण पाणीसाठा क्षमता ५१.00 टीएमसी, सध्याचा पाणीसाठा ३८.४२ टीएमसी, सध्याची पाणी पातळी ६३७.९३ मीटर, सध्याचा इनफ्लो ५३५९२.00 क्युसेस. सध्याचा आउटफ्लो १२९.00 क्युसेस. मार्कंडेय जलाशय : एकूण पाणीसाठा क्षमता ३.६९ टीएमसी, सध्याचा पाणीसाठा ३.२२ टीएमसी, सध्याचा इनफ्लो ६२३८.00 क्युसेस. सध्याचा आउटफ्लो ४७४४.00 क्युसेस.
अलमट्टी जलाशय : एकूण पाणीसाठा क्षमता १२३.00 टीएमसी, सध्याचा पाणीसाठा ९१.९३ टीएमसी, सध्याची पाणी पातळी ५१७.५८ मीटर, सध्याचा इनफ्लो १९६३८९.00 क्युसेस. सध्याचा आउटफ्लो १७0000.00 क्युसेस.