मिथुन राशीतून उद्या रात्री सर्वाधिक उल्कावर्षाव; खगोलप्रेमींसाठी पर्वणी
By संदीप आडनाईक | Published: December 13, 2023 07:02 PM2023-12-13T19:02:32+5:302023-12-13T19:02:48+5:30
मिथुन राशीतून उद्या, १४ डिसेंबरच्या रात्री म्हणजे १५ डिसेंबरच्या पहाटे सर्वाधिक उल्का वर्षाव खगोलप्रेमींसाठी अनुभवायला मिळणार आहे.
कोल्हापूर : मिथुन राशीतून उद्या, १४ डिसेंबरच्या रात्री म्हणजे १५ डिसेंबरच्या पहाटे सर्वाधिक उल्का वर्षाव खगोलप्रेमींसाठी अनुभवायला मिळणार आहे. शहरापासून दूर जेथे प्रकाशाचा उपद्रव होणार नाही तेथे छान उल्कावर्षाव पाहायला होणार आहे. हा उल्कावर्षाव अत्यंत तेजस्वी दिसत असल्याने ह्याचा आस्वाद घ्यायला फार मजा येणार आहे.
१४ डिसेंबर रोजी रात्री सुमारे १२ वाजल्यापासून आकाशात कुठल्याही दिशेला (विशेषतः पूर्वेला) उल्कावर्षाव दिसेल. आकाश छान आणि प्रकाशापासून दूर असल्यास तासाला तब्बल १०० उल्का पडताना दिसतील. याच दिवशी सर्वाधिक उल्का वर्षाव अनुभवायला मिळणार आहे. परंतु त्यानंतरच्या शनिवार-रविवारी होणाऱ्या ट्रेक लीडर्सना या दिवशी सुद्धा डोंगरातून फार सुंदर उल्का पडताना पाहायला मिळणार आहेत. ही तिथी अमावस्येच्या जवळची असल्याने चंद्र प्रकाश अडथळा निर्माण करणार नाही, त्यामुळे हा उल्कावर्षाव पाहणं अत्यंत मनमोहक असेल अशी माहिती खगोलशास्त्रज्ञांनी दिली आहे.