महापौर कॉँग्रेसचाच; आघाडीवर शिक्कामोर्तब
By admin | Published: November 4, 2015 01:07 AM2015-11-04T01:07:32+5:302015-11-04T01:07:46+5:30
राजकारणात चमत्कार घडत असतात. त्यामुळे १६ तारखेला कोल्हापूरचा महापौर भाजपचाच होईल.
कोल्हापूर : महानगरपालिकेतील सत्तासंघर्षावर पडदा टाकत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आघाडी करण्याचा निर्णय मंगळवारी घेतला. सर्वाधिक २७ नगरसेवक असलेल्या काँग्रेस पक्षाकडे महापौरपद राहणार असून उपमहापौरपद हे राष्ट्रवादीला देण्यात येणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची मंगळवारी एका हॉटेलमध्ये बैठक झाली. या बैठकीत काँग्रेस व राष्ट्रवादीने आघाडी करण्याचा निर्णय घेतला. तसेच पहिल्या वर्षी काँग्रेसचा महापौर करण्यावर सहमती झाली, तर उपमहापौरपदासह स्थायी समिती सभापतिपद राष्ट्रवादीला देण्याचा निर्णय झाला. पदाधिकारी निवडीचे सर्वाधिकार सतेज पाटील व हसन मुश्रीफ यांना देण्यात आले.
/ सविस्तर वृत्त २
राजकारणात चमत्कार घडत असतात. त्यामुळे १६ तारखेला कोल्हापूरचा महापौर भाजपचाच होईल. त्यासाठी करवीरनिवासिनी अंबाबाईला साकडे घातले आहे, तसेच माझ्याकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी उद्या मुंबईला आणि परवा दिल्लीला जाणार आहे. दोन दिवसांत ‘गुड न्यूज’ देतो. - चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्री