महापौर माळवींचे नगरसेवकपद रद्द करा

By Admin | Published: April 1, 2015 12:19 AM2015-04-01T00:19:18+5:302015-04-01T00:31:39+5:30

मुख्यमंत्र्यांना शिष्टमंडळाचे साकडे : सकारात्मक निर्णय घेऊ - फडणवीस

Mayor Malvi's corporator can be canceled | महापौर माळवींचे नगरसेवकपद रद्द करा

महापौर माळवींचे नगरसेवकपद रद्द करा

googlenewsNext

सभागृहाने २० मार्चला महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम १३ (१) (अ) व (ब) तसेच कलम १० (१-१अ) मधील तरतुदींचा आधार घेत संमत केले. मात्र, या ठरावांवर महापौरांनी अद्याप स्वाक्षरी केलेली नाही. सभागृहातील इतिवृत्ताच्या आधारे नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना महापौरांचे नगरसेवकपद रद्द करण्यासाठी साकडे घातले.
भ्रष्टाचारमुक्त प्रशासन हा भाजपचा अजेंडा आहे. महापौर माळवी यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ३१ जानेवारीला कारवाई केली. मात्र, महापौरांनी राजीनामा देण्यास ठाम नकार दिला आहे. महापौरांवर लाचप्रकरणी कारवाईची ही देशातील पहिलीच घटना आहे. या प्रकरणी राज्य शासनाने विशेष अधिकार वापरून नगरसेवकपद रद्दची कारवाई करण्याची मागणी यापूर्वीच नगरसेवक ांनी ३ व ९ मार्चला पत्राद्वारे केली आहे तरी महापौरांचे नगरसेवकपद रद्द करून पदाचा मान राखावा, अशी विनंती शिष्टमंडळाने केली.यावेळी आमदार हसन मुश्रीफ, उपमहापौर मोहन गोंजारे, स्थायी समिती सभापती आदिल फरास, गटनेता राजेश लाटकर व शारंगधर देशमुख, परिवहन सभापती अजित पोवार, शिक्षण मंडळ सभापती संजय मोहिते, विरोधी पक्षनेता मुरलीधर जाधव, नगरसेवक सचिन चव्हाण, प्रा. जयंत पाटील, चंद्रकांत घाटगे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
पालकमंत्र्यांची हुलकावणी
महापौर हटावसाठी भाजपने महापालिकेच्या दारात मोठे आंदोलनही केले. मुख्यमंत्र्यांच्या दालनात जाण्यापूर्वी शिष्टमंडळाने पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना सोबत येण्याची विनंती केली. मात्र, ते न आल्याने नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. विशेषाधिकार वापरा
लाचखोर प्रकरणात अडकूनही राजीनामा देण्यास तयार नाहीत, तरी राज्य शासनाने ‘विशेष अधिकार’ वापरून महापालिका कायद्याआधारे (कलम १० (१-१अ)नुसार) माळवी यांचे नगरसेवकपद रद्द करावे, असे शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Web Title: Mayor Malvi's corporator can be canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.