महापौरांनी केली प्राथमिक शाळांची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2017 09:42 PM2017-08-08T21:42:25+5:302017-08-08T21:42:56+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी त्रुटी व उणिवा दूर करून शाळांना द्याव्या लागणाºया सोई-सुविधाच्या अनुषंगाने मंगळवारी महापौर हसिना फरास, प्राथमिक शिक्षण समितीच्या सभापती वनिता देठे यांनी पदाधिकारी, अधिकाºयांसह शाळांची पाहणी केली.
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी त्रुटी व उणिवा दूर करून शाळांना द्याव्या लागणाºया सोई-सुविधाच्या अनुषंगाने मंगळवारी महापौर हसिना फरास, प्राथमिक शिक्षण समितीच्या सभापती वनिता देठे यांनी पदाधिकारी, अधिकाºयांसह शाळांची पाहणी केली.
महापालिकेच्या शाळांमध्ये ज्या त्रुटी असतील, त्यांचा अभ्यास करून महापालिका व शासन निधीतून आणि पी.पी.पी. तत्त्वावर शाळा विकसित करण्यात येणार आहेत. मुलांच्या शिक्षणाचा दर्जा कशा प्रकारे वाढविता येईल, यासाठी महापौर व पदाधिकारी यांनी शाळांची पाहणी करण्याचे नियोजन केले होते.
या पार्श्वभूमीवर मंगळवारपासून महापालिकेच्या शाळांची पाहणी करण्याची सुरुवात करण्यात आली.
यामध्ये मंगळवारी संत रोहिदास विद्यामंदिर, सुभाषनगर; वीर कक्कया विद्यालय, जवाहरनगर; शाबाजखान अमीनखान जमादार उर्दू मराठी स्कूल, वि. स. खांडेकर विद्यामंदिर, प्रतिभानगर या शाळांची पाहणी केली. पाहणीमध्ये शिक्षणपद्धती, ई-लर्निंग सुविधा, मूलभूत सोई-सुविधा, पोषण आहार, इमारतीची दुरवस्था, आदींची पाहणी केली. यावेळी महापौरांनी शाळेमध्ये लागणाºया सुविधा व इतर आवश्यक कामांची यादी देण्याबाबत संबंधित मुख्याध्यापक व अधिकाºयांना सूचना दिल्या. तसेच शाळा स्वयंपूर्ण बनविण्यासाठी एक महिन्याच्या आत सर्व शाळांचा आराखडा तयार करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
दरम्यान, वीर कक्कया विद्यालयाची गुणवंत विद्यार्थिनी सुफिया गौसमहंमद पटेल हिचे मेंदूज्वराने निधन झाल्याने महापौर हसिना फरास व पदाधिकाºयांनी तिच्या घरी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. सुफिया वीर कक्कया शाळेची हुशार व गुणी विद्यार्थिनी होती. पाचवीच्या स्कॉलरशिपमध्ये तिचा जिल्हा गुणवत्ता यादीत क्रमांक आला होता. तिच्यावर आधार हॉस्पिटलमध्ये गेल्या चार महिन्यांपासून उपचार चालू होते.
यावेळी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती वहिदा सौदागर, उपसभापती प्रतीक्षा पाटील, छाया पोवार, सभागृह नेता प्रवीण केसरकर, नगरसेवक अशोक जाधव, नगरसेविका सविता घोरपडे, सतीश घोरपडे, प्राथमिक शिक्षण समितीचे लेखापाल राजीव साळोखे, प्रोजेक्ट आॅफिसर रसूल पाटील, शैक्षणिक पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे, कनिष्ठ अभियंता दत्तात्रय पाटील, शांताराम सुतार, आदी उपस्थित होते.