महापालिकेत स्थिर महापौर देणार
By Admin | Published: October 11, 2015 11:37 PM2015-10-11T23:37:52+5:302015-10-12T00:29:31+5:30
‘लोकमत’शी थेट संवाद : ‘४१ प्लस’ शिवसेनेचे मिशन असल्याचा आमदार राजेश क्षीरसागर यांचा दावा--आमचा पक्ष आमची भूमिका
महापालिका निवडणुकीत पहिल्यांदाच भाजप-शिवसेना स्वतंत्रपणे लढत आहेत. या निवडणुकीत शिवसेनेचा जाहीरनामा आणि भूमिका काय आहे, हे आमदार राजेश क्षीरसागर यांनी ‘लोकमत’शी संवाद साधून स्पष्टपणे मांडली. यावेळी त्यांनी शहराच्या विकासासाठी आपला पक्ष काय करणार याची ‘ब्लू प्रिंट’ मांडून स्वच्छ कारभार आणि गतिमान प्रशासन देण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले.
कोल्हापूर : ‘४१ प्लस’ हे मिशन डोळ्यांसमोर ठेवून शिवसेना महानगरपालिकेची निवडणूक लढवीत आहे. चळवळ आणि विकासकामांच्या माध्यमातून पक्षाने जनतेशी नाळ कायम ठेवली आहे. त्यामुळे या निवडणुकीत नक्कीच बहुमताचा जादूई आकडा पूर्ण करीत शिवसेना कुणाच्या कुबड्या न घेता महापालिकेची सत्ता एकहाती काबीज करील. तसेच कोल्हापूर शहराला पदाची खांडोळी न करता स्थिर महापौर देईल, असा विश्वास आमदार राजेश क्षीरसागर यांनी शनिवारी सायंकाळी येथे व्यक्त केला. विधानसभेला कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेने जशी शिवसेनेला भरभरून साथ दिली, त्याचीच पुनरावृत्ती महापालिका निवडणुकीतही करावी, असे आवाहनही आमदार क्षीरसागर यांनी यावेळी केले.
त्यांनी ‘लोकमत’च्या शहर कार्यालयाला भेट देऊन निवडणुकीतील भूमिका व जाहीरनामा यांचे सविस्तर विवेचन केले. क्षीरसागर म्हणाले, १९७२ साली महापालिका अस्तित्वात आल्यानंतर आजतागायत शहराची एक इंचही हद्दवाढ झाली नाही. भाजपकडूनच हद्दवाढीला विरोध होत आहे. उद्योजकांसाठी हा विरोध आहे; परंतु हद्दवाढ का नको असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. शहरात राहायचे आणि हद्दीत यायला नको, हा दुटप्पीपणा या लोकांनी सोडला पाहिजे. तुम्ही एलबीटी तसेच जकात या माध्यमातून पैसे घेता, तर शहराच्या विकासाला हातभार लावायला मागे का?
नगरसेवकांना १९८५ ते ९० पर्यंतच्या काळात विशेष आदर होता. त्यांना जनाची नाही तर मनाची लाज होती; परंतु त्यानंतरच्या सभागृहात चित्र बदलले आहे. आता प्रतिष्ठेसाठी महापालिकेत निवडून जाऊन बाजार मांडला जात आहे. त्यामुळे विकासकामांसाठी चांगले कंत्राटदार कोल्हापूरला यायला तयार नाहीत. ‘नगरोत्थान’सारख्या योजनेतून अनेक कंत्राटदारांनी कामे अर्धवट सोडली आहेत.
सध्याच्या महापालिकेतील सत्ताधाऱ्यांकडून निधी मिळविण्यासाठी कोणतीही धोरणे राबविली जाताना दिसत नाहीत. गत तीस वर्र्षांतील २५ वर्षे ताराराणी आघाडीची सत्ता राहिली. त्यांनी महापौरांसह सर्वच पदांची खांडोळी करून चुकीची पद्धत रूढ केली. त्याचाच कित्ता सध्याची कॉँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी गिरवत आहे. या पाच वर्षांतील कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा कारभारही चांगला नसून, तोही भ्रष्टाचाराने बरबटलेला आहे. राष्ट्रवादीच्या महापौरांच्या लाच प्रकरणाने तर कोल्हापूरची मान शरमेने खाली गेली आहे. कॉँग्रेस व राष्ट्रवादीने निवडणुकीपूर्वी जाहीर केलेल्या जाहीरनाम्याला त्यांनीच हरताळ फासला आहे. कोणतीही करवाढ करणार नाही, शासकीय जमिनींवर आरक्षण टाकणार नाही, असे म्हणणाऱ्या या आघाडीने प्रत्यक्षात घरफाळ्यात वाढ केली. तसेच जमिनींवरील आरक्षणे उठवून त्या जमिनी धनदांडग्यांच्या देऊन भ्रष्टाचार केला. या कार्यकाळातील एकच चांगले काम म्हणता येईल, तेही थेट पाईपलाईनचे. परंतु त्यासाठीही आपण जुलै २०१२ मध्ये पावसाळी अधिवेशनात आमरण उपोषण केल्यावर सरकारचे डोळे उघडले.
विकासाचे व्हिजन
गेल्या तीस वर्षांतील ताराराणी आघाडी व कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेसचा गैरकारभार व भ्रष्टाचार जनतेला माहीत आहे. त्यामुळे एक चांगले शहर घडवायचे असून लोकांना सुशासन द्यायचे आहे. चांगले रस्ते, कचरा निर्गतीकरण, भुयारी गटर योजना, उद्याने, रंकाळा व पंचगंगा प्रदूषणमुक्ती, तीर्थक्षेत्र विकास, फेरीवाला धोरण व झोपडपट्टी विकास, बचत गटांसाठी बचत भवन, सुसज्ज व्यायामशाळा हे शिवसेनेचे शहराच्या विकासाचे व्हिजन आहे. ते घेऊनच लोकांसमोर जाणार आहोत. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी ३०० कोटींच्या निधीसाठी (पान ७ वर)