‘महापौर चषक’ ला मुहूर्त सापडला

By admin | Published: February 20, 2017 12:25 AM2017-02-20T00:25:35+5:302017-02-20T00:25:35+5:30

उद्या किंवा बुधवारी ‘किक आॅफ’ होण्याची शक्यता

The 'mayor trophy' was found in the muhurat | ‘महापौर चषक’ ला मुहूर्त सापडला

‘महापौर चषक’ ला मुहूर्त सापडला

Next



कोल्हापूर : गेले दशकभर बंद पडलेली व कोल्हापूरच्या फुटबॉल जगतात मानाची समजली जाणारी ‘कोल्हापूर महापौर चषक फुटबॉल’ स्पर्धा यंदाच्या वर्षापासून पुन्हा सुरू होत आहे. यासाठी महापौर हसीना फरास, नगरसेवक सचिन पाटील आदींनी पुढाकार घेऊन फुटबॉल शौकिनांसह खेळाडूंना सुखद धक्का दिला आहे.
एकेकाळी महापौर चषक फुटबॉल स्पर्धा कोल्हापूरसह राज्यभरात प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून गणली जात होती. या स्पर्धेसाठी अनेक संघ त्यावेळी चातकासारखी स्पर्धा कधी होणार म्हणून वाट पाहत असत. ही स्पर्धा विजय साळोखे, संभाजी जाधव, सई खराडे यांच्यासारखे पदाधिकारी महापालिकेत असेपर्यंत ही स्पर्धा व्यवस्थित सुरू होती. त्यानंतर फुटबॉलवर प्रेम करणारे नगरसेवक सभागृहात आले नाहीत. त्यामुळे ही स्पर्धा सुमारे दहा वर्षांपूर्वी बंद पडली. विशेष म्हणजे महापालिकेचाही फुटबॉल संघ त्याकाळी होता तरीही कालांतराने क्रीडा स्पर्धांसाठी निधी असूनही तो परत गेला.
२०१५ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकात सचिन पाटील, संतोष गायकवाड, विजयसिंह खाडे-पाटील, संभाजी जाधव, नियाज खान, अर्जुन माने आदी खेळाडू सभागृहात निवडून आले. पहिल्याच वर्षी ही स्पर्धा होईल असे फुटबॉल शौकिनांना वाटले होते. मात्र, तसे घडले नाही. अखेर यंदा या स्पर्धेसाठी या खेळाडू असलेल्या नगरसेवकांनी व महापौर यांनी पुढाकार घेऊन ही स्पर्धा पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. अखेर स्पर्धेला प्रशासनानेही पाठबळ दिले आणि मंगळवारी (दि. २२) किंवा बुधवारी (दि. २३) ला ‘किक आॅफ’ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.(प्रतिनिधी)

Web Title: The 'mayor trophy' was found in the muhurat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.