महापौरपदाचा ‘लोभ’स काटेरी मुकुट!

By admin | Published: November 16, 2015 12:23 AM2015-11-16T00:23:11+5:302015-11-16T00:44:42+5:30

महापालिकेचे राजरंग : महापौरपदाची खांडोळी; माळवी प्रकरणाने बदनामी

Mayor's greed 'thorny crown'! | महापौरपदाचा ‘लोभ’स काटेरी मुकुट!

महापौरपदाचा ‘लोभ’स काटेरी मुकुट!

Next

तानाजी पोवार --कोल्हापूर महानगरपालिकेत एकदा महापौर झाल्यानंतर पुन्हा त्यांना नगरसेवक म्हणून निवडून येण्यासाठी जनतेनेच नाकारले आहे. त्याला फक्त कांचन कवाळे याच अपवाद आहेत. याचाच अर्थ असा की, महापौर म्हणजे महानगरपालिकेच्या राजकारणातून निवृत्ती घेतल्याचा प्रकार आहे. याशिवाय तीन महिन्यांचा महापौर व तृप्ती माळवी लाच प्रकरणाने महानगरपालिकेची बदनामी झाली असल्याचेही नमूद करावे लागेल. हे पद म्हणजे काटेरी मुकुटच आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या ४२व्या महापौरपदासाठी काँग्रेसच्या अश्विनी रामाणे, तर उपमहापौरपदी राष्ट्रवादीच्या शमा मुल्ला यांची निवड निश्चित आहे. भाजप-ताराराणी आघाडी विरोधी बाकांवर बसण्यास तयार असली, तरीही त्यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या गोटांतील नगरसेवकांमध्ये अस्वस्थता कायम आहे. आज, सोमवारी या निवडीवर शिक्कामोर्तब होत आहे.

विधानसभेची
अधुरी स्वप्ने
महापौरपदानंतर विधानसभा हेच प्रत्येकाचे स्वप्न असते. अ‍ॅड. महादेवराव आडगुळे, अ‍ॅड. शामराव शिंदे, आर. के. पोवार या माजी महापौरांसह नगरसेवक सत्यजित ऊर्फ नाना कदम यांनी विधानसभेच्या निवडणुका लढविल्या; पण त्यांना निराशाच प्राप्त झाली. १९८९ मध्ये रामभाऊ फाळके यांनी शहराच्या पाणीप्रश्नासाठी महापौरपदाचा मुदतपूर्व राजीनामा दिला. त्यांनी शिवसेनेकडून लोकसभेची निवडणूक लढविली.


पहिल्या महिला महापौर
महिला आरक्षण आल्यानंतर पहिल्या महिला महापौरपदाचा मान हा १९९४ मध्ये जयश्री बबेराव जाधव यांनी मिळविला. तत्पूर्वी पहिल्या महिला उपमहापौरपदाचा मान अ‍ॅड. मालती आनंदराव हळदकर यांनी १९९० मध्ये मिळविला.
अल्पसंख्याक व दलित महापौर
‘बिनआवाजाचा बॉम्ब फुटणार’ अशी घोषणा करून १९९८ मध्ये महादेवराव महाडिकांच्या ताराराणी आघाडीविरोधात शिवसेनेच्या साथीने गनिमी कावा करून बाबू फरास यांनी सुरुंग लावला. अल्पमतातील कांचन कवाळे महापौर झाल्या. पुढील वर्षी स्वत: बाबू फरास हे महापौर बनले. तत्पूर्वी १९९० मध्ये रघुनाथ बावडेकर यांना महापौरपदाची संंधी देऊन दलित समाजाला मान दिला.



पती-पत्नी, पिता-पुत्र
महापौर-उपमहापौर
सन १९९२-९३ मध्ये बंडोपंत नाईकवडे महापौर, तर त्यांच्या पत्नी सुलोचना नाईकवडे उपमहापौरपदी एकाच वेळी विराजमान झाल्याची ही एकमेव घटना आहे. १९८० मध्ये दत्तात्रय कणेरकर यांना महापौरपद, तर त्यांचे पुत्र शिरीष कणेरकर यांना २०११ मध्ये हेच पद मिळाले. १९८५ मध्ये धोंडिराम रेडेकर यांना महापौरपद, तर त्यांच्या पत्नी सुशीला रेडेकर यांना १९९९ ला उपमहापौरपद मिळाले. कांचन कवाळे (१९९८) व त्यांच्या स्नुषा कादंबरी कवाळे (२०११) यांनीही महापौरपद मिळाले. तसेच जयश्री सोनवणे यांनी २०१३ मध्ये महापौरपदावर काम केले. त्यांचे पती हरिदास सोनवणे (२००३), सासरे रामकृष्ण सोनवणे (१९८८) यांनी उपमहापौरपदावर काम केले आहे.


पती-पत्नी, पिता-पुत्र
महापौर-उपमहापौर
सन १९९२-९३ मध्ये बंडोपंत नाईकवडे महापौर, तर त्यांच्या पत्नी सुलोचना नाईकवडे उपमहापौरपदी एकाच वेळी विराजमान झाल्याची ही एकमेव घटना आहे. १९८० मध्ये दत्तात्रय कणेरकर यांना महापौरपद, तर त्यांचे पुत्र शिरीष कणेरकर यांना २०११ मध्ये हेच पद मिळाले. १९८५ मध्ये धोंडिराम रेडेकर यांना महापौरपद, तर त्यांच्या पत्नी सुशीला रेडेकर यांना १९९९ ला उपमहापौरपद मिळाले. कांचन कवाळे (१९९८) व त्यांच्या स्नुषा कादंबरी कवाळे (२०११) यांनीही महापौरपद मिळाले. तसेच जयश्री सोनवणे यांनी २०१३ मध्ये महापौरपदावर काम केले. त्यांचे पती हरिदास सोनवणे (२००३), सासरे रामकृष्ण सोनवणे (१९८८) यांनी उपमहापौरपदावर काम केले आहे.


घरात दोन नगरसेवकपदे
बंडोपंत नाईकवडे आणि त्यांच्या पत्नी सुलोचना नाईकवडे, कांचन कवाळे यांच्या स्नुषा कादंबरी कवाळे, प्रकाश नाईकनवरे
व त्यांच्या पत्नी प्रतिभा नाईकनवरे, किरण दरवान व त्यांच्या बहीण अलका जाधव यांनी एकाच सभागृहात कामकाज केले
आहे.

महापौर, उपमहापौर सुविधा
महापौरपदासाठी प्रथम नागरिक म्हणून मानाचे स्थान, स्वतंत्र गाडी, स्वतंत्र कक्ष, सभागृहातील कामकाज चालविण्याचा अधिकार, नगरसेवकपदापेक्षा दुप्पट मानधन असते. उपमहापौरपद हे महापौरपदाच्या गैरहजेरीत सभागृह चालविण्यासाठी सोयीचे निर्माण केले आहे; पण अनेकवेळा त्यांना सभागृह चालविण्याचा मान मिळत नसल्याने त्यावर ‘शोभेचे बाहुले’ म्हणून टीका होते. या पदासाठी स्वतंत्र गाडी, स्वतंत्र कक्ष इतक्याच सुविधा मिळतात.


पदाची उंची वाढविणारे पहिले महापौर
बाबासाहेब जाधव
(कै.) बाबासाहेब जाधव (कसबेकर) यांना पहिले महापौर होण्याचा मान १९७८ मध्ये मिळाला. एक वर्षाच्या कार्यकालमध्ये महापौरपदाची उंची ही खुर्चीमुळे नव्हे तर माणसामुळे वाढते, हे त्यांनी दाखवून दिले. शिवाजी विद्यापीठात पदवीदान समारंभावेळी त्यांना पहिल्या रांगेत बसण्याचे मानाचे स्थान न दिल्याने त्यांनी ४१ नगरसेवकांसह समारंभावर बहिष्कार घातल्याने शहरात गदारोळ माजला. त्यावेळी तत्कालीन कुलगुरूंनी जाहीर माफी मागितल्यामुळे विषयावर पडदा पडला.


गाजलेली लढत
सन १९९० मध्ये शिवाजी पेठेतून भिकशेठ पाटील आणि शिवाजीराव चव्हाण यांच्यातील नगरसेवक पदाची निवडणूक आजही कोल्हापूरकरांच्या स्मरणात आहे. या चुरशीच्या लढतीत नागरिकांनी सामान्य कुटुंबातील भिकशेठ पाटील यांना ११ मतांनी विजयी केले. ही पराभवाची सल काढण्यासाठी चव्हाण यांचे चिरंजीव अजिंक्य चव्हाण यांना विजयी करून त्यांचे स्वप्न पूर्ण केले.

महापौरपदाची खांडोळी
महापौरपदासाठी नाव सुचविताना नेत्यांना तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे नेत्यांनी आपली राजकीय खुर्ची सांभाळण्यासाठी या महापौरपदाची खांडोळी करून अनेकांचे समाधान केले. त्यामध्ये शिरीष कणेरकर यांना सहा महिने, भीमराव पोवार आणि दीपक जाधव यांना प्रत्येकी चार महिने, तर दिलीप मगदूम आणि बाजीराव चव्हाण यांना प्रत्येकी अडीच महिने कालावधी मिळाला; पण या पदाच्या खांडोळ्यांमुळे महाराष्ट्रभर कोल्हापूर महापालिकेची बदनामी झाली. सर्वांत जास्त कालावधी खराडे यांना मिळाला. पंचवार्षिक निवडणुका झाल्यानंतर पक्षातील राजकारणाचा फायदा उठवत सई इंद्रनील खराडे यांनी नोव्हेंबर २००५ ते मे २००८ हा अडीच वर्षांचा महापौरपदाचा कालावधी पूर्ण मिळविला.

Web Title: Mayor's greed 'thorny crown'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.