महापौरांच्या राजीनाम्याचा मुहूर्त ठरला, शुक्रवारच्या सभेत देणार राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2019 07:27 PM2019-11-05T19:27:49+5:302019-11-05T19:29:45+5:30
गेल्या काही दिवसांपासूनच्या हालचालींमुळे अखेर मंगळवारी महापौर माधवी गवंडी यांच्या राजीनाम्याचा मुहूर्त ठरला. शुक्रवारी (दि. ८) होणाऱ्या महानगरपालिकेच्या सभेत गवंडी आपला राजीनामा देऊन या विषयावर पडदा टाकणार आहेत. त्यामुळे सूरमंजिरी लाटकर यांचा महापौर होण्यातील उरलासुरला अडथळाही आता दूर झाला.
कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासूनच्या हालचालींमुळे अखेर मंगळवारी महापौर माधवी गवंडी यांच्या राजीनाम्याचा मुहूर्त ठरला. शुक्रवारी (दि. ८) होणाऱ्या महानगरपालिकेच्या सभेत गवंडी आपला राजीनामा देऊन या विषयावर पडदा टाकणार आहेत. त्यामुळे सूरमंजिरी लाटकर यांचा महापौर होण्यातील उरलासुरला अडथळाही आता दूर झाला.
विधानसभेची निवडणूक संपल्यानंतर गेल्या पाच-सहा दिवसांपासून महापौरांच्या राजीनाम्यावर चर्चा सुरू होती. त्यांनी राजीनामा द्यावा म्हणून सोमवारी (दि. ४) राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी निरोप दिला.
त्यानुसार त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता महानगरपालिकेची तहकूब सभा बोलाविण्यात आली असून, तसा अजेंडा नगरसेवकांना पाठविण्यात आला आहे.
शुक्रवारी राजीनामा सादर केल्यानंतर तत्काळ नगरसचिव कार्यालयाकडून नवीन महापौर निवडणुकीचा कार्यक्रम निश्चित करून घेतला जाईल. दि. १५ किंवा दि. १६ नोव्हेंबर रोजी नवीन महापौरांची निवडणूक होऊ शकते.