‘सेंट्रल किचन’मधून रोज तीन हजार पूरग्रस्तांना जेवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:22 AM2021-07-26T04:22:41+5:302021-07-26T04:22:41+5:30
महापुरामुळे शहरातील विविध २७ ठिकाणी पूरग्रस्त भागातील सुमारे दोन हजार नागरिक स्थलांतरित झाले आहेत. त्यांना जेवण पुरविण्याची गरज लक्षात ...
महापुरामुळे शहरातील विविध २७ ठिकाणी पूरग्रस्त भागातील सुमारे दोन हजार नागरिक स्थलांतरित झाले आहेत. त्यांना जेवण पुरविण्याची गरज लक्षात घेऊन कोल्हापूर डिझास्टर मॅनेजमेंट ग्रुप कार्यन्वित झाला. या ग्रुपने पहिल्या टप्प्यात स्थलांतरित झालेल्या नागरिकांना जेवण पुरविण्याचा निर्णय घेतला. त्याची सुरुवात शुक्रवारी केली. पहिल्या दिवशी एक हजार पूरग्रस्तांना जेवण पुरविण्यात आले. त्यानंतर शनिवारपासून महासैनिक दरबार हॉलमध्ये सेंट्रल किचनची सुुरुवात केली. तेथून शहरातील विविध ठिकाणी असलेल्या दीड हजार पूरग्रस्तांना दुपारी आणि सायंकाळी जेवण, चहा-नाष्टा पुरविण्यात येत आहे. त्याचे नियोजन कोल्हापूर जिल्हा हॉटेल मालक संघ आणि कोल्हापूर केटरर्स वेल्फेअर असोसिएशनने केले आहे. त्यासाठी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, किराणा भुसार असोसिएशन आदी संघटनांनी मदतीचा हात दिला आहे. पूर ओसरल्यानंतर स्वच्छतेचे काम क्रेडाई कोल्हापूर आणि अर्थ मुव्हर्स असोसिएशन करणार आहे. या ग्रुपकडून वैद्यकीय सुविधाही पुरविण्यात येणार आहे.
चौकट
जेवणासाठी यांचे हात राबताहेत
कोल्हापूर हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष उज्ज्वल नागेशकर, आनंद माने, अमित हळवणकर, दुर्गेश लिंग्रस, सचिन शानबाग, महेश शानबाग, मिलिंद घाटगे, जयवंत पुरेकर, कोल्हापूर केटरर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष महावीर सन्नके, योगेश सावंत, प्रदीप जोशी, रोहन दुधाणे, ओंकार शुक्ल.
प्रतिक्रिया
पूरस्थिती कमी होईपर्यंत हे सेंट्रल किचन सुरू राहणार आहे. त्याच्या माध्यमातून दालखिचडी, व्हेजपुलाव, पुरी भाजी पूरग्रस्तांना देण्यात येत आहे. या उपक्रमासाठी कोल्हापूर डिझास्टर मॅनेजमेंट ग्रुप अंतर्गत विविध संघटना योगदान देत आहेत.
-आनंद माने, माजी अध्यक्ष, कोल्हापूर हॉटेल मालक संघ.
फोटो कोलडेस्कवर पाठविले आहेत.
फोटो ओळी : कोल्हापुरातील महासैनिक दरबार हॉलमध्ये कोल्हापूर डिझास्टर मॅनेजमेंट ग्रुपने सेंट्रल किचन सुरू केले आहे. शहरात स्थलांतरित झालेल्या पूरग्रस्तांना या किचनच्या माध्यमातून जेवण पुरविण्यात येत आहे. (छाया : आदित्य वेल्हाळ)