लंडनमध्ये वादळाने वीज खंडित झाल्यावर जेवण, राहण्याचे पॅकेज, अन् कोल्हापुरात दिवसा विजेसाठी रात्र रस्त्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 12:59 PM2022-02-24T12:59:45+5:302022-02-24T13:00:07+5:30

झुणका भाकर खाऊन राजू शेट्टी यांच्यासह आंदोलनकर्ते शेतकरी महावितरणच्या दारातच झोपी गेले. हा फोटो दिवसभर सर्वत्र व्हायरल झाला.

Meals, accommodation packages after night power outage in London, day and night on the road for electricity in Kolhapur | लंडनमध्ये वादळाने वीज खंडित झाल्यावर जेवण, राहण्याचे पॅकेज, अन् कोल्हापुरात दिवसा विजेसाठी रात्र रस्त्यावर

लंडनमध्ये वादळाने वीज खंडित झाल्यावर जेवण, राहण्याचे पॅकेज, अन् कोल्हापुरात दिवसा विजेसाठी रात्र रस्त्यावर

googlenewsNext

कोल्हापूर : लंडनमध्ये वादळ झाल्यामुळे चार दिवसांपासून वीज बंद असल्याने तेथील कंपनीने वीज येईपर्यंत संबंधित भागातील नागरिकांना जेवण आणि राहण्यासाठी हॉटेलचे पॅकेज दिले आहे, पण इकडे कोल्हापुरात घर पाच महिन्यांपासून बंद आहे, तरीही महावितरणने १७०० रुपयांचे बिल पाठवून दिले. बिल भरायला उशीर केला म्हणून कनेक्शन तोडायला माणूसही पाठवून दिला.

खरंच आपण भाग्यवान आहोत, आपले इंग्लडपेक्षा कार्यक्षम वीज मंडळ आहे, अशी उपरोधिक प्रतिक्रिया थेट लंडनमधून शेतकरी संघटनेच्या ट्विटरवर आली आहे. राजू शेट्टी यांनी महावितरणच्या कार्यालयासमोर रात्री सुरू असलेल्या धरणे आंदोलनाचा फोटो ट्विट केल्यावर ऑक्सफोर्ड परिसरात राहणाऱ्या मराठी तरुणाने ही उपरोधिक प्रतिक्रिया दिली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिवसा विजेसह बिल दुरुस्ती व अन्यायी वसुलीच्या विरोधात मंगळवारपासून महावितरणच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. मंगळवारी मध्यरात्री कार्यकर्त्यांनीच तेथे चूल मांडून तयार केेलेला झुणका भाकर खाऊन शेट्टी यांच्यासह आंदोलनकर्ते शेतकरी महावितरणच्या दारातच झोपी गेले. दरम्यान, यातील एक कार्यकर्त्याने मध्यरात्री हा फोटो काढत समाज माध्यमावर टाकला. स्वत: शेट्टी यांनी सकाळी आपल्या ट्विटर हॅण्डलवरून हा फोटो शेअर केेला. हा फोटो दिवसभर सर्वत्र व्हायरल झाला.

त्यावर सुमित बरगाळे या लंडनमध्ये राहणाऱ्या तरुणाने शेट्टीचा महावितरणच्या समोर झोपलेल्या फोटोला रिट्विट व कमेंट करताना लंडन आणि कोल्हापुरातील वीज कंपनीची तुलना केली. लंडनमध्ये वादळ झाल्याने चार दिवसांपासून वीजपुरवठा ठप्प झाला. नागरिकांची गैरसोय नको म्हणून तेथील वीज कंपनीने नागरिकांना पॅकेज जाहीर केले.

यात वीज नसल्याने जेवण करता येत नसेल तर रोज बाहेरून जेवण आणण्यासाठी ६० पौंड्स म्हणजेच ६ हजार रुपये मिळत आहेत. या रकमेचे ते जेवण घरी मागवू शकतात, किंवा हॉटेलमध्ये जाऊन जेऊ शकतात. वीज नसल्याने घरात राहणे शक्य नसल्यास हॉटेलमध्ये राहण्याची सोयही वीज कंपनीने करून दिली आहे. हे सर्व सांगितल्यानंतर त्याने इथल्या महावितरणचे प्रताप सांगताना बंद घर असतानाही बिल पाठवून देऊन कनेक्शन तोडण्याची केलेल्या कार्यवाहीचा उल्लेख करून कार्यक्षम वीज मंडळ अशी उपरोधिक टीकाही केली आहे.

दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच

महावितरणच्या कार्यालयासमोर सुरू असलेले आंदोलन बुधवारीही सुरू राहिले. महावितरणचे अधीक्षक अभियंता अंकुर कावळे यांनी मंगळवारी रात्री येऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली, पण त्यांना नकार मिळाला. बुधवारी कोणाही अधिकाऱ्यांनी विचारपूस केली नाही अथवा चर्चेेसाठी आमंत्रणही आलेले नाही.

Web Title: Meals, accommodation packages after night power outage in London, day and night on the road for electricity in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.