कोविड केअर सेंटरमध्ये जेवण, नाष्टा वेळेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:26 AM2021-05-20T04:26:38+5:302021-05-20T04:26:38+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला त्याप्रमाणात जिल्ह्यात कोविड केअर सेंटरची संख्या वाढली. त्याठिकाणी असलेल्या रुग्णांना दिवसातून दोनवेळा चहा, नाष्टा आणि ...
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला त्याप्रमाणात जिल्ह्यात कोविड केअर सेंटरची संख्या वाढली. त्याठिकाणी असलेल्या रुग्णांना दिवसातून दोनवेळा चहा, नाष्टा आणि जेवण दिले जाते. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने स्वतंत्र व्यवस्था कार्यान्वित केली आहे. त्याद्वारे या सेंटरमध्ये चहा, नाष्टा, जेवण पुरविण्यात येत आहे. प्रशासनाने सकाळी आठ ते साडेनऊ या वेळेत चहा, नाष्टा. दुपारी साडेबारा ते अडीच या वेळेत जेवण. दुपारी चार वाजता चहा, तर रात्री साडेसात ते साडेआठ या वेळेत जेवण देण्याची वेळ ठरवून दिली आहे. शहर आणि तालुका पातळीवरील काही स्वयंसेवी, सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती आपल्या परीने काही वेळा नाष्टा, जेवण देतात. हे सर्व काही वेळेवर मिळत असल्याचे जिल्ह्यातील काही सेंटरमधील रुग्णांनी सांगितले.
चौकट
तरच, गारगोटीमध्ये थोडा उशीर
गारगोटी येथील ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रातील कोविड सेंटरमध्ये वेळेवर नाष्टा, जेवण मिळते. सामाजिक संस्था अथवा दानशूर व्यक्तींनी नाष्टा पुरविला, तरच थोडा उशीर होतो. या सेंटरमध्ये सकाळी आठ ते साडेआठ या वेळेत चहा, नाष्टा (कांदापोहे/ शिरा/ उप्पीट). दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत जेवण (दोन चपाती, वरण, भाजी, भात). दुपारी चार वाजता चहा. रात्री आठ वाजता जेवण (दोन चपाती, भाजी, आमटी, भात).
चौकट
चव लागत नसल्याने इचलकरंजीत घरचा डबा
इचलकरंजीतील तात्यासोा मुसळे हायस्कूलमधील कोविड सेंटरमध्ये चहा, नाष्टा, जेवण वेळेत मिळते. मात्र, चव लागत नसल्याचे कारण पुढे करत काही रुग्ण हे घरातून डबा मागवून घेतात. सकाळी नऊ वाजता चहा, नाष्टा (कांदापोहे/ उप्पीट), दुपारी एक वाजता जेवण (चपाती, भाजी, भात, वरण). सायंकाळी पाच वाजता चहा. रात्री साडेसातनंतर जेवण.
चौकट
डीओटी सेंटरमध्ये वेळेवर जेवण
शिवाजी विद्यापीठातील तंत्रज्ञान अधिविभागाच्या (डीओटी) कोविड सेंटरमध्ये वेळेवर जेवण, नाष्टा मिळत आहे. सकाळी साडेआठ ते नऊदरम्यान चहा, नाष्टा (उप्पीट/ कांदापोहे). दुपारी साडेबारा ते एक या वेळेत जेवण (चपाती, भाजी, भात, आमटी, केळी/अंडी). सायंकाळी पाच वाजता चहा. रात्री साडेआठ वाजता जेवण.
चौकट
गडहिंग्लजमध्ये नाष्टा, जेवण ‘भारी’
गडहिंग्लज नगरपालिकेच्या कोविड सेंटरमध्ये सकाळी आठ वाजता हळदीचे दूध, चहा, नाष्टा (कांदापोहे/ उप्पीट/ मोड आलेली कडधान्ये). दुपारी बारा वाजता जेवण (दोन भाकरी, पालेभाजी, कडधान्याची उसळ, भात, आमटी, अंडी). दुपारी चार वाजता चहा. रात्री आठ वाजता जेवण.
प्रतिक्रिया
कोविड केअर सेंटरमधील रुग्णांना वेळेत आणि चांगले जेवण पुरविण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित आहे. आतापर्यंत नाष्टा, जेवणाबाबत एकही तक्रार आमच्याकडे झालेली नाही. नाष्टा, जेवणाचा दर्जा आणि ते वेळेवर पुरविण्यात येते का, याचा रोज आढावा घेतला जातो.
-डॉ. योगेश साळे, जिल्हा आरोग्याधिकारी.
पॉइंटर
जिल्ह्यातील एकूण कोविड केअर सेंटर : १८०
या सेंटर्समध्ये सध्या दाखल रुग्ण : १३,७००
===Photopath===
190521\19kol_1_19052021_5.jpg
===Caption===
डमी (१९०५२०२१-कोल-स्टार ७२७ डमी)