३,००० पेक्षा जास्त लोकांची जेवणाची सोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:18 AM2021-05-28T04:18:50+5:302021-05-28T04:18:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पेठवडगाव : वाठार तर्फ वडगाव येथील महेश जगताप सोशल यूथ फाउंडेशनने कडक लॉकडाऊनच्या काळात ३,००० पेक्षा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पेठवडगाव : वाठार तर्फ वडगाव येथील महेश जगताप सोशल यूथ फाउंडेशनने कडक लॉकडाऊनच्या काळात ३,००० पेक्षा जास्त गरजू लोकांना जेवण वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली. पारगाव, किणी परिसरातील कोविड सेंटरमधील रुग्ण, त्यांचे नातेवाईक, महामार्गावरील ट्रक चालक, वाहक, बंदोबस्तात तैनात असलेले पोलीस, होमगार्ड, सुरक्षारक्षक आदींना जेवण पुरवण्यात येत आहे. त्याचप्रमाणे वाठार, अंबप, सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.
कोल्हापूर जिल्ह्यातील
कोरोनाच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक लॉकडाऊन लावले होते. त्या काळात हॉटेल, उपहारगृह बंद असल्यामुळे रुग्णांचे नातेवाईक, महामार्गावर वाहतूक करणारे चालक, वाहक, पोलीस, सुरक्षारक्षकांच्या जेवणाचे हाल होत होते.
या पार्श्वभूमीवर वाठार तर्फ वडगाव येथील महेश जगताप सोशल यूथ फाउंडेशनने पालकमंत्री सतेज पाटील, आमदार राजूबाबा आवळे यांच्या पुढाकाराने एक घास आपुलकीचा ही संकल्पना राबवत हजारो लोकांना जेवण पुरवले. दररोज २५० लोकांना चपाती, भाजी, भात आमटी असे डबे कोविड सेंटर, तपासणी नाके, महामार्गावरील चौकी आणि वाठार येथील सेंटरवरून वाटप करण्यात आले. गेल्या दहा दिवसात ३,००० हजार पेक्षा जास्त लोकांनी या उपक्रमांचा लाभ घेतला आहे. या उपक्रमासाठी संयोजक महेश जगताप, गजानन कुंभार, मोहन कुंभार, विनू भोसले, प्रतीक शिंगे, अनिकेत कांबळे, अक्षय घोरपडे आदींनी सहकार्य केले. परिसरातील अनेक दानशूर व्यक्तींनी विविध वस्तू देत उपक्रमास हातभार लावला.
फोटो कॅप्शन : वठार तर्फ वडगाव : येथील महेश जगताप सोशल यूथ फाउंडेशनचा उपक्रमाचा प्रारंभ करताना पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, शेजारी महेश जगताप, गजानन कुंभार, मोहन कुुंभार, विनू भोसले, प्रतीक शिंगे, अनिकेत कांबळे, अक्षय घोरपडे आदी उपस्थित होते.
२७ जगताप फाउंडेशन