‘सेंट्रल किचन’मधून रोज दीड हजार पूरग्रस्तांना जेवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:21 AM2021-07-25T04:21:23+5:302021-07-25T04:21:23+5:30

महापुरामुळे शहरातील विविध २७ ठिकाणी पूरग्रस्त भागातील सुमारे दोन हजार नागरिक स्थलांतरित झाले आहेत. त्यांना जेवण पुरविण्याची गरज लक्षात ...

Meals for one and a half thousand flood victims daily from 'Central Kitchen' | ‘सेंट्रल किचन’मधून रोज दीड हजार पूरग्रस्तांना जेवण

‘सेंट्रल किचन’मधून रोज दीड हजार पूरग्रस्तांना जेवण

Next

महापुरामुळे शहरातील विविध २७ ठिकाणी पूरग्रस्त भागातील सुमारे दोन हजार नागरिक स्थलांतरित झाले आहेत. त्यांना जेवण पुरविण्याची गरज लक्षात घेऊन कोल्हापूर डिझास्टर मॅॅनेजमेंट ग्रुप कार्यन्वित झाला आहे. या ग्रुपने पहिल्या टप्प्यात स्थलांतरित झालेल्या नागरिकांना जेवण पुरविण्याचा निर्णय घेतला. त्याची सुरुवात शुक्रवारी करण्यात आली. पहिल्या दिवशी एक हजार पूरग्रस्तांना जेवण पुरविण्यात आले. त्यानंतर शनिवारपासून महासैनिक दरबार हॉलमध्ये सेंट्रल किचनची सुुरुवात करण्यात आली. तेथून शहरातील विविध ठिकाणी असलेल्या दीड हजार पूरग्रस्तांना जेवण पुरविण्यात आले. जेवणाचे नियोजन कोल्हापूर जिल्हा हॉटेल मालक संघ आणि कोल्हापूर केटरर्स वेल्फेअर असोसिएशनकडून करण्यात आले आहे. त्यासाठी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, किराणा भुसार असोसिएशन, आदी संघटनांनी मदतीचा हात दिला आहे. पूर ओसरल्यानंतर स्वच्छतेचे काम क्रिडाई कोल्हापूर आणि अर्थमुव्हर्स असोसिएशन करणार आहे.

चौकट

जेवणासाठी यांचे हात राबताहेत

कोल्हापूर हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष उज्वल नागेशकर, आनंद माने, अमित हळवणकर, दुर्गेश लिंग्रस, सचिन शानबाग, महेश शानबाग, मिलिंद घाटगे, कोल्हापूर केटरर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष महावीर सन्नके, योगेश सावंत, प्रदीप जोशी, रोहन दुधाणे, ओंकार शुक्ल.

प्रतिक्रिया

पूरस्थिती कमी होईपर्यंत हे सेंट्रल किचन सुरू राहणार आहे. त्याच्या माध्यमातून दालखिचडी, व्हेजपुलाव, पुरीभाजी पूरग्रस्तांना देण्यात येत आहे. या उपक्रमासाठी कोल्हापूर डिझास्टर मॅॅनेजमेंट ग्रुपअंतर्गत विविध संघटना योगदान देत आहेत.

-आनंद माने, माजी अध्यक्ष, कोल्हापूर हॉटेल मालक संघ.

Web Title: Meals for one and a half thousand flood victims daily from 'Central Kitchen'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.