सार्थक क्रिएशन नव्या वास्तूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:29 AM2021-08-18T04:29:07+5:302021-08-18T04:29:07+5:30
नृत्य दिग्दर्शक सागर बगाडे संचालित या संस्थेत नृत्य, नाट्य, अभिनय , संगीत ,चित्र ,शिल्प , मॉडेलिंग , फिटनेस या ...
नृत्य दिग्दर्शक सागर बगाडे संचालित या संस्थेत नृत्य, नाट्य, अभिनय , संगीत ,चित्र ,शिल्प , मॉडेलिंग , फिटनेस या सर्व कलांचे एकत्रित शिक्षण दिले जाणार आहे. शाहूपुरीतील वर्धमान चिंतामणी कॉम्प्लेक्स, पतंजली स्टोअरजवळ येथील या वास्तूत कमर्शियल कोर्सेससोबतच वंचित घटकांसाठी मोफत प्रशिक्षण सुविधादेखील उपलब्ध आहे. यावेळी माजी खासदार धनंजय महाडिक , दिग्दर्शक चंद्रकांत जोशी, सन्मती मिरजे ,मिलिंद धोंड ,कुलदीप शिंगटे , प्रकाश मेहता, इंद्रजित चव्हाण,प्राचार्य एस. एस. चव्हाण , प्रमोद पाटील ,डॉ. प्रवीण कोडोलीकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सागर बगाडे यांनी प्रास्ताविक केले. निशांत गोंधळी यांनी सूत्रसंचालन व निशांत कावणेकर यांनी आभार मानले.
--
फोटो नं १७०८२०२१-कोल-सार्थक क्रिएशन
ओळ : कोल्हापुरातील शाहूपुरी येथील वास्तूत सार्थक क्रिएशनचा शुभारंभ सोहळा झाला. यावेळी विजय टिपूगडे, मिलिंद धोंड, अभिनेते भरत जाधव, चंद्रकांत जोशी, सन्मती मिरजे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
---