अर्जुनवाड येथे कृष्णेच्या विसर्गाचे मोजमाप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:30 AM2021-07-07T04:30:11+5:302021-07-07T04:30:11+5:30
कनिष्ठ अभियंता रूपेशकुमार यादव व अजित माने यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचे मोजमाप करण्यास सुरुवात झाली आहे. अर्जुनवाड येथे कार्यसहायक उद्धव ...
कनिष्ठ अभियंता रूपेशकुमार यादव व अजित माने यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचे मोजमाप करण्यास सुरुवात झाली आहे. अर्जुनवाड येथे कार्यसहायक उद्धव मगदूम यांच्या नेतृत्वाखाली पाण्याचा विसर्ग मोजण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी रावसाहेब माने, राहुल डोंगरे, संताजी मगदूम, गणेश डोंगरे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
केंद्रीय जल आयोगाच्या सर्वच केंद्रावर पाण्याची खोली, रुंदी व गती मोजली जाते. शिवाय हवेची दिशा, गती कमाल व किमान तापमान मोजण्याबरोबरच प्रत्येक तासाला पाण्याच्या पातळीची नोंदही घेण्यात येते. काही केंद्रावर पाणी तपासणीच्या प्रयोगशाळाही आहेत. तेथे पाण्याचा दर्जा, पाण्यातील आॅक्सिजन, पाण्यातील गाळ याचेही मोजमाप करण्यात येते. पाण्याचे नमुनेही पुणे व वरिष्ठ प्रयोगशाळांमध्ये पाठविण्यात येतात. त्यामुळे पाण्यातील जीवसृष्टी, मानवास व शेतीसपूरक की अपायकारक याचाही अहवाल मिळण्यास केंद्र सरकारला मदत होते.
फोटो - ०६०७२०२१-जेएवाय-०१
फोटो ओळ - अर्जुनवाड (ता. शिरोळ) येथील कृष्णा नदीच्या पाण्याच्या विसर्गाचे मोजमाप करण्यात आले.