कोरोना लढाईत वैद्यकीय संघटना एकवटल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:21 AM2021-04-19T04:21:30+5:302021-04-19T04:21:30+5:30

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाच्या आलेल्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर बेड्स, ऑक्सिजन, औषधांची कमतरता भासू नये यासाठी कोल्हापुरातील वैद्यकीय संस्थांची ...

Medical associations rallied in the battle of Corona | कोरोना लढाईत वैद्यकीय संघटना एकवटल्या

कोरोना लढाईत वैद्यकीय संघटना एकवटल्या

Next

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाच्या आलेल्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर बेड्स, ऑक्सिजन, औषधांची कमतरता भासू नये यासाठी कोल्हापुरातील वैद्यकीय संस्थांची शिखरसंस्था असणाऱ्या इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा कोल्हापूर आणि त्याच्याशी संबंधित वैद्यकीय संघटनांनी विशेष यंत्रणा उभी केली आहे.

मेडिकल असोसिएशन, फना, हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडिया, नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा),होमिओपॅथी असोसिएशन(निहा), आयुर्वेद व्यासपीठ संघटना आणि जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन (जीपीए) या सर्व वैद्यकीय संघटना यांनी कोरोना लढाईत एकवटल्या आहेत. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी विशेष यंत्रणा उभी करून सज्ज झाल्या आहेत.

कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. आशा जाधव, सचिव डॉ. किरण दोशी, खजानिस डॉ. ए. बी. पाटील,डॉ. अमर आडके, फना संघटनेचे अध्यक्ष डॉ. भरत कोटकर, सचिव डॉ. अभिजित तगारे, निमा संघटनेचे अध्यक्ष डॉ. मुकुंद मोकाशी, सचिव डॉ. राजेंद्र वायचळ, जनरल प्रॅक्टिशनर्सच्या अध्यक्षा डॉ. उषा निंबाळकर, सचिव डॉ. महादेव जोगदंडे, निहा संघटनेचे अध्यक्ष डॉ. हर्षवर्धन जगताप, सचिव डॉ. तुषार पांडव यांनी याबद्दलचे निवेदन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना दिले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात ठेवण्यासाठी सर्व वैद्यकीय संघटना एकत्रित येऊन यात पुढाकार घेतला याबद्दल जिल्हाधिकारी यांनी समाधान व्यक्त केले आहे तसेच ज्यांना या कार्यात सहभागी व्हायची इच्छा आहे असे डॉक्टर, नर्सेस, वैद्यकीय कर्मचारी यांनी कोल्हापूर मेडिकल असोसिएशनशी किंवा अध्यक्षा डॉ. आशा जाधव यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मेडिकल असोसिएशनतर्फे करण्यात आले आहे.

फोटो क्रमांक - १८०४२०२१-कोल-केएमए

ओळ - कोल्हापूर मेडिकल असोसिएशनसह सर्वच वैद्यकीय संघटनांनी कोरोना विरुद्धच्या लढाईत लढण्यास सज्ज असल्याने निवेदन डॉ. आशा जाधव यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना दिले.

Web Title: Medical associations rallied in the battle of Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.