जंगली गव्याचे प्राण वाचविण्यात वनविभागाच्या वैद्यकीय पथकाला यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 05:23 PM2021-04-12T17:23:57+5:302021-04-12T17:47:53+5:30

ForestDepartment Wildlife Kolhapur : जंगलातुन मानवीस्तीकडे आलेल्या व पळून दमछाक झालेल्या रानगव्याला वनविभागाच्या कर्मचाऱ्यानी औषधो उपचार करून जीवदान दिले आहे . त्यामुळे पर्यावरण प्रेमीतुन वनकर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले जात आहे. 

The medical team of the forest department succeeded in saving the life of the wild cow | जंगली गव्याचे प्राण वाचविण्यात वनविभागाच्या वैद्यकीय पथकाला यश

   जंगलातुन बिथरलेल्या गव्याला वनकर्मचाऱ्यांनी सलाईन लाऊन उभे असलेले वनकर्मचारी .

Next
ठळक मुद्देजंगली गव्याचे प्राण वाचविण्यात वनविभागाच्या वैद्यकीय पथकाला यश५० तासांची मॅरेथॉन उपचारांची शर्थ

राजू कांबळे  /विकास शहा

मलकापूर/शिराळा : जंगलातुन मानवीस्तीकडे आलेल्या व पळून दमछाक झालेल्या रानगव्याला वनविभागाच्या कर्मचाऱ्यानी औषधो उपचार करून जीवदान दिले आहे . त्यामुळे पर्यावरण प्रेमीतुन वनकर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले जात आहे. 

नागरीकांना गव्यांना हुसकावण्या साठी आरडा ओरडा केला असता गवे कडवी नदीतुन पेरीड  ( ता . शाहूवाडी ) गावच्या शिवारात गेले त्यातील एक गवा पळता , पळता पेरीड गावच्चा शिवारात पडला होता .

 मंगळवारी सकाळी मलकापूर शहरातील राजवाड्याजवळ आलेल्या चार गव्यांना पूर्ववत जंगलाच्या दिशेने हुसकावताना यातील दोन वर्षांचा गवा वाट चुकून सैरभैर पळाल्यामुळे शरीरातील पाणी व क्षार कमी होऊन निपचित पडला होता .त्याला उठता येत नव्हते वनकर्मचाऱ्यांनी त्याला भूलीचे इंजेवशन देऊन टॅक्टर मध्ये सोडले .  दरम्यान , गव्याचे डी - हायड्रेशन , अतिउष्णतेमुळे वाढलेली हृदयाची स्पंदने तातडीने कमी करण्यासाठी मलकापूर पालिकेचा अग्निशमन बंब पाचारण करण्यात आला . पाण्याच्या फवाऱ्याद्वारे गव्याच्या शरीराचे तापमान नियंत्रणात आले . परंतु , प्रकृती खालावत चालल्यामुळे स्थानिक पशुवैद्यकाच्या मदतीने काही सलाईन व प्रतिजैविकांची मात्रा दिली गेली 

पशुवैधकीय अधिकारी डॉ संतोष वाळवेकर यांना बोलावून त्याला सलाईन चढविण्यात आले . त्यामुळे गव्याची तब्बेत सुधारू लागली आहे. गव्याच्या रक्षणासाठी मलकापूर वनविभागाचे पाच कर्मचारी रात्र दिवस पहारा देत आहेत . गेले तीन दिवस जंगली गव्यावर उपचार सुरु आहेत.

त्याचा जीव वाचविण्यासाठी वनविभागाला ग्रामस्थांच्या मदतीने  वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी गव्यावर कलेल्या उपचारामुळे गव्याला जीवदान मिळाले आहे . पेरीड ग्रामस्थांनी मोलाची मदत केली असल्याचे नंदकुमार नलवडे यांनी सांगितले. हा गवा अद्यापही पेरीड गाडेवाडी जवळच्या जंगलात वैद्यकीय पथकाच्या निगराणीत  आहे.  गव्याला जीवदान देण्यासाठी  वनपरिक्षेत्र अधिकारी नंदकुमार नलवडे , डॉ . माळी , खोत , वनपाल संजय कांबळे , राजाराम राजीगरे , वनरक्षक जालंदर कांबळे , किरण खोत ,विठ्ठल वारकरी , शाहिद मिस्त्री , बाळू भोसले यांनी यासाठी परिश्रम घेतले .
 

Web Title: The medical team of the forest department succeeded in saving the life of the wild cow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.