ध्यान हा मानवी जीवनाचा वारसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 12:47 PM2019-11-25T12:47:49+5:302019-11-25T12:49:49+5:30
प्रधान म्हणाले, प्रत्येकजण डोळे झाकून ध्यान करण्याचा प्रयत्न करतो. मात्र, त्यांच्या मनात अनेक विचार येतात. प्रत्येकजण विविध क्षेत्रांत कार्यरत आहे. प्रत्येकाला ताणतणावाला सामोरे जावे लागत आहे. या परिस्थितीत ध्यानधारणाच त्या व्यक्तीला तारू शकते. यासाठी मन स्थिर कसे करता येईल, यावर अधिक भर दिला पाहिजे.
कोल्हापूर : ध्यानधारणा हा मानवी जीवनाचा वारसा आहे. वैयक्तिक आयुष्यात त्याचा प्रत्येकाला फायदा होतो. काम कोणतेही असो; त्यात मन स्थिर करण्याचे काम केवळ ध्यानामुळे शक्य आहे, असे मत हार्टफुलनेस संस्थेचे प्रादेशिक समन्वयक तुषार प्रधान यांनी केले. कोल्हापुरातील ताराबाई पार्क येथील महासैनिक दरबार हॉलमध्ये रविवारी सायंकाळी आयोजित केलेल्या ‘ध्यानोत्सव’ या कार्यक्रमात ते बोलत होते.
प्रधान म्हणाले, प्रत्येकजण डोळे झाकून ध्यान करण्याचा प्रयत्न करतो. मात्र, त्यांच्या मनात अनेक विचार येतात. प्रत्येकजण विविध क्षेत्रांत कार्यरत आहे. प्रत्येकाला ताणतणावाला सामोरे जावे लागत आहे. या परिस्थितीत ध्यानधारणाच त्या व्यक्तीला तारू शकते. यासाठी मन स्थिर कसे करता येईल, यावर अधिक भर दिला पाहिजे. त्याकरिता ध्यान ही सुरुवात आहे. रोज सकाळी ध्यानसाधनेचा सराव केला तर अंतर्मनात एकमत होऊ शकते. प्रत्येक कामात रोज काही मिनिटे जरी ध्यान केले तरी त्याचा फायदा त्या व्यक्तीला वैयक्तिक आयुष्यात मोठ्या प्रमाणात होतो. प्राणाहुती (योगिक शक्तीचे संप्रेषण) व आंतरिक शुद्धिकरण हे ध्यानाचा सखोल अनुभव घेण्यास प्रभावीपणे सहायक ठरतात. ज्यामुळे एक संतुलित जीवन, निरोगी स्वास्थ्य, मन:शांती आणि शीघ्र व्यक्तिगत रूपांतरण शक्य होते. नियमित जीवनातही भांडणे करणाऱ्या दोन व्यक्तींमध्ये शांत राहणारा जिंकतो. कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी ध्यान महत्त्वाचे आहे. त्याकरिता सराव आवश्यक आहे. शास्त्रोक्त पद्धतीने ध्यान कसे करायचे याबद्दल त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. के. ए. कुलकर्णी यांनी ध्यानावरील पुस्तकाचे विश्लेषण केले. प्रेरणा पाटील व नितीन पाटील यांनी सूत्रसंचालन केले. यानिमित्त ब्राईटर माइंडच्या वतीने डोळे झाकलेल्या मुलांनी अंतर्मनाने कागदावर लिहिलेले शब्द ओळखून दाखविले.
तत्पूर्वी कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी दौलत देसाई, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, डॉ. सचिन पाटील, डॉ. सरोज नेजदार, डॉ. नितीन भोसले, आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले.
-------------
फोटो स्वतंत्र ध्यानोत्सव या नावाने ओळींसह सेव्ह केले आहेत.
----------
- सचिन भोसले
------------