वडणगेतील नवीन पाण्याच्या टाकीच्या पिलरला भेगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:52 AM2020-12-11T04:52:59+5:302020-12-11T04:52:59+5:30
वडणगे : वडणगे (ता. करवीर) येथील राष्ट्रीय पेयजल योजनेतंर्गत बांधलेल्या नवीन पाण्याच्या टाकीच्या एका पिलरच्या बांधकामाला भेगा पडल्या ...
वडणगे : वडणगे (ता. करवीर) येथील राष्ट्रीय पेयजल योजनेतंर्गत बांधलेल्या नवीन पाण्याच्या टाकीच्या एका पिलरच्या बांधकामाला भेगा पडल्या आहेत. त्यामुळे या कामाविषयी ग्रामस्थांमधून शंका उपस्थित केली जात असून या टाकीच्या पिलरचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी होत आहे. येथे राष्ट्रीय पेयजल योजनेतून साडेबारा लाख लिटर क्षमता असलेली पाण्याची टाकी दोन वर्षांपूर्वी बांधण्यात आली आहे. या टाकीतूनच वडणगेला पाणीपुरवठा केला जातो. मात्र, सध्या या टाकीच्या पिलरला भेगा पडल्याने टाकीच्या कामाच्या दर्जाविषयी प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे या कामाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी ग्रामस्थांमधून जोर धरत आहे. दरम्यान, जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे ग्रामीण उपअभियंता अरविंद डोंगरे व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी टाकीच्या कामाची नुकतीच पाहणी केली असून इंजिनिअरिंग कॉलेजमार्फत या कामाचे स्ट्रक्चरल ऑडिट करून याबाबतचा अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे सांगितले.
चौकट
काम सुरू असताना कोसळला होता स्लॅब
दोन वर्षांपूर्वी टाकीचे काम सुरू असताना स्लॅब कोसळला होता. त्यामुळे सुरुवातीपासूनच या कामाबाबत तक्रारी झाल्या होत्या. आता पिलरलाही तडे गेल्याने ठेकेदाराकडून टाकीचे काम योग्य झाले नसल्याची शंका उपस्थित होऊ लागली आहे.
फोटो ०९ वडणगे पाणीटाकी
ओळी
- वडणगे (ता.करवीर) येथील राष्ट्रीय पेयजल योजनेतंर्गत बांधलेल्या नवीन पाण्याच्या टाकीच्या एका पिलरच्या बांधकामाला पडलेले तडे.
फोटो ems ला पाठविला आहे.